दर आठवड्यात एकदा मद्यपान करणे अनेकांना स्वीकार्य वाटते, परंतु अधूनमधून घेतलेले मद्यसुद्धा आरोग्यावर परिणाम करू शकते. यथार्थ सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्स, फरीदाबादचे इंटरनल मेडिसिन आणि रुमॅटोलॉजी विभागाचे संचालक डॉ. जयंत ठाकुरिया यांच्या मते, “मद्याचे परिणाम व्यक्तीनुसार, त्याच्या जीवनशैलीनुसार आणि इतर सवयींनुसार (जसे की धूम्रपान) बदलतात.”

डॉ. ठाकुरिया सांगतात की, “आठवड्यातील ६० मि.ली.पर्यंत मद्यपान बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाऊ शकते. मात्र, ते चेतावणी देतात की, “कधी कधी जास्त प्रमाणात मद्य घेतले तर ते शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर आणि प्रणालींवर अनावश्यक ताण आणते.” त्यामुळे संयम पाळल्यास मद्याचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात, पण ते पूर्णपणे धोक टाळू शकत नाही.”

‘बिंज ड्रिंकिंग’ म्हणजे अल्प वेळेत मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे हे सर्वात हानिकारक ठरते. “अशा पद्धतीचे मद्यपान केल्यास यकृताशी संबंधित आजार, हृदयविकार किंवा गंभीर प्रकरणांत मृत्यूही होऊ शकतो,” असे डॉ. ठाकुरिया स्पष्ट करतात. आठवड्यातून फक्त एकदाच मद्य घेतले तरी अशा प्रकारचे बिंज ड्रिंकिंग शरीराच्या संतुलनात बिघाड निर्माण करते.

आठवड्यातून एकदा मद्यपान केल्याने शरीराच्या प्रणालीवर कसा परिणाम होतो ( How drinking once a week affects body’s system)

यकृत आणि मूत्रपिंड (Liver and Kidneys)

“आठवड्यातून एकदाच मद्य घेतले तरी यकृतावर ताण येतो,” असे डॉ. जयंत ठाकुरिया सांगतात. दीर्घकाळ असे सेवन केल्यास फॅटी लिव्हर किंवा तीव्र यकृतविकार उद्भवू शकतात. तसेच मद्यामुळे शरीरात डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) होते, ज्यामुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते, विशेषतः जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण आधीच कमी असते.

हृदय आणि रक्ताभिसरण प्रणाली (Heart and Circulatory System)

हृदयविकार प्रणालीवर मद्याचे परिणाम लक्षणीय असतात. “हे रक्तदाब वाढवते आणि अनियमित हृदयगती निर्माण करू शकते,” असे डॉ. ठाकुरिया स्पष्ट करतात. धूम्रपान आणि मद्यपान एकत्र केल्यास हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो.

वजन आणि चयापचय (Weight and Metabolism)

मद्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. स्नॅक्सबरोबर त्याचे सेवन केल्यास वजन वाढते, “यामुळे पोट फुगणे (abdominal bloating) होते आणि शरीरातील चयापचय प्रक्रिया विस्कळीत होते,” असे डॉ. ठाकुरिया सांगतात. नियमित मद्यपान केल्यास वजन नियंत्रणात ठेवणे अधिक अवघड होते.

झोपेवर परिणाम (Impact on Sleep)

मद्य घेतल्यावर सुरुवातीला झोप येत असल्यासारखे वाटते, परंतु दीर्घकाळात झोपेची गुणवत्ता बिघडते. “मद्य झोपेच्या पुनरुत्थानात्मक टप्प्यांना (restorative stages) बाधा आणते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि अस्वस्थता जाणवते,” असे डॉ. ठाकुरिया सांगतात. अशा प्रकारची झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करते.

पचनसंस्थेचे आरोग्य (Digestive Health)

मद्य पचनसंस्थेवर चिडचिड करणारा परिणाम करतो, विशेषतः मोठ्या प्रमाणात घेतल्यास. “यामुळे अॅसिड रिफ्लक्स, अन्ननलिकेत जळजळ आणि गंभीर प्रकरणांत आतड्यांमधून रक्तस्राव किंवा रक्त वांती होऊ शकते,” असे डॉ. ठाकुरिया सांगतात; त्यामुळे जबाबदारीने मद्यपान करणे अत्यंत आवश्यक आहे.

औषधांसह परस्परसंवाद (Interactions with Medications)

मद्य काही औषधांशी, विशेषतः सिडेटिव्ह्स (झोप आणणारी औषधे) आणि मानसिक आरोग्याच्या औषधांशी, हानिकारक प्रतिक्रिया निर्माण करतो. “या परस्पर संवादामुळे डिसल्फिरामसदृश प्रतिक्रिया (disulfiram-like reactions) किंवा आतड्यांशी संबंधित त्रास वाढू शकतो,” असा इशारा डॉ. ठाकुरिया देतात, त्यामुळे औषधोपचार सुरू असताना मद्यपान करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

कोणत्या लोकांनी पूर्णपणे मद्यपान टाळावे? (Who should avoid alcohol altogether?)

काही लोकसमूहांवर मद्याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होतात आणि त्यामुळे त्यांनी मद्यपान पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. डॉ. जयंत ठाकुरिया यांच्या मते खालील गट विशेष जोखमीचे आहेत —

१. गर्भवती महिला (Pregnant Women)

मद्य गर्भाच्या वाढीवर गंभीर परिणाम करतो, त्यामुळे अपत्याच्या आयुष्यभर राहणाऱ्या शारीरिक आणि मानसिक तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे गर्भवती महिलांनी मद्यपान करू नये.

२. दीर्घकालीन आजार असलेले व्यक्ती (Individuals with Chronic Conditions)

यकृतविकार, हृदयविकार किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांनी मद्यपान पूर्णपणे टाळावे. अशा व्यक्तींमध्ये मद्यामुळे आजार अधिक बिघडू शकतात.

३. औषधे घेणारे लोक (Medication Users)

सिडेटिव्ह (sedatives), सायकेट्रिक औषधे किंवा डिसल्फिरामसदृश प्रतिक्रिया निर्माण करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी मद्यपान करू नये. या औषधांशी मद्याचे परस्परसंवाद गंभीर दुष्परिणाम घडवू शकतात.

४. वाहनचालक (Drivers)

थोड्याशा प्रमाणात घेतलेले मद्यसुद्धा माणसाच्या जलद प्रतिक्रियेवर (reflexes) परिणाम करतो आणि निर्णयक्षमता (decision-making) कमी करतो, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो; त्यामुळे वाहनचालकांनी मद्यपान टाळावे

५. अ‍ॅसिडिटी किंवा पचनसंस्थेच्या तक्रारी असणारे लोक (People with Acid Reflux or Digestive Issues)

मद्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स, अन्ननलिकेत जळजळ आणि गंभीर प्रकरणात आतड्यांतून रक्तस्राव होऊ शकतो, त्यामुळे अशा व्यक्तींनी मद्यपान टाळावे.

डॉ. ठाकुरिया सांगतात, “आठवड्यातून एकदाच घेतलेले अल्प प्रमाणातील मद्य बहुतांश लोकांसाठी हानिकारक नसते. मात्र, जबाबदारीने मद्यपान करणे आणि त्याचे परिणाम समजून घेणे हे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”