भारतात मोतीबिंदू, दृष्टीदोष आणि बुबुळाला फूल पडणे ह्या प्रमुख समस्या आहेत. ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटात सुमारे ८% लोकांना मोतीबिंदू असतो. शाळकरी वयातल्या ७% मुलांना काही ना काही दृष्टीदोष असतो. एकूण लोकसंख्येत शंभरात एकाला तरी काही ना काही दृष्टीदोष असतो.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि बुब्बुळ कलम शस्त्रक्रियेची देशात फार मोठी गरज आहे. सुमारे २० लाख मोतीबिंदू आणि ३० लाख बुब्बुळ कलम शस्त्रक्रियांच्या प्रतीक्षेत आहेत. छोटया उद्योगधंद्यांचे प्रमाण वाढल्यामुळे डोळयांच्या जखमांचे प्रमाणही वाढले आहे.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात एसी आरोग्याला धोकादायक?
मोतीबिंदू म्हणजे डोळयाच्या बाहुलीतले भिंग नेहमीप्रमाणे काचेसारखे पारदर्शक न राहता तांदळाच्या दाण्यासारखे पांढुरके होते. यामुळे प्रकाशकिरण आत शिरायला अडथळा होतो. मोतीबिंदू सहसा उतारवयात येतो. मधुमेहामुळे तो लवकर वयात येऊ शकतो. मोतीबिंदू आल्यावर नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. रात्री गाडी चालवताना समोरचा लाईट जास्त त्रासदायक होतो. डोळयांसमोर काळे वर्तुळ दिसते. दिवसा (जास्त प्रकाशात) कमी दिसते. पण संध्याकाळी (कमी प्रकाश असतो तेव्हा) दिसण्यात थोडी सुधारणा होते, इत्यादी. एकाऐवजी अनेक प्रतिमा दिसणे हे पण एक लक्षण आहे. मोतीबिंदू किती पिकला आहे यावर तक्रारींचे स्वरूप अवलंबून असते.

आणखी वाचा: Health Special: सारकोपेनिया म्हणजे काय?

मोतीबिंदू लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून काढून त्याऐवजी डोळयातच कायमचे भिंग बसवले जाते. मात्र औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही.
मोतीबिंदू होऊ नये म्हणून जेवणात लसूण भरपूर असावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या देशात उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळयावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण चांगला प्रतिबंधक उपाय आहे. संगणक व टीव्हीच्या किरणांमुळे मोतीबिंदू लवकर होतो. CD स्क्रीनमुळे हा दुष्परिणाम टळतो.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मोतीबिंदूची जुनी शस्त्रक्रिया आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी मोतीबिंदू काढून चष्मा दिला जात होता. आता मोतीबिंदूच्या जागी नवीन कृत्रिम भिंग बसवले जाते. या भिंगाने चष्म्याची गरजच राहिली नाही. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.

१.साधी टाक्याची पद्धत
यात बुब्बुळाच्या परिघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी आता नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे टाके टाकावे लागतात. हे टाके जखम भरायला थोडे दिवस लागतात. ही पद्धत सर्वत्र प्रचलित आहे.

२.बिनटाक्याची ‘फिको’ पध्दत
यामध्ये छेद फक्त २.२ मि.मी.चा असतो. यात एक सूक्ष्म हत्यार फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात व तो द्रवरुप करून शोषून घेतात. यामुळे मोतीबिंदू लहान छेदातून काढता येतो. मोकळया जागी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व आत ते उघडते. या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत. यात आत आणखी नवीन उपकरणे आली असल्याने छेद आणखी थोडा लहान झाला आहे. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम भिंग
हे भिंग म्हणजे एक वरदानच आहे. हे उच्च प्रतीच्या प्लास्टिकचे बनवतात. यात अनेक प्रकार आहेत. त्यातल्या आधुनिक प्रकारांमुळे नैसर्गिक भिंगाच्या सारखी लवचिकता आली आहे. यामुळे आता लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीसाठी वापरावा लागणारा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची गरज राहत नाही. मूळ दृष्टीदोषाचा विचार करून हे कृत्रिम भिंग निवडले जाते.
शस्त्रक्रियेनंतर सुमारे ९७-९८% लोकांना पूर्णपणे दृष्टीलाभ होतो. मात्र काहींच्या बाबतीत समस्या निर्माण होतात. विशेषत: साध्या टाक्याच्या शस्त्रक्रियेनंतर भिंगाच्या मागच्या बाजूला धुरकटपणा निर्माण होऊ शकतो. याला लेसर उपचार करावे लागतात.