When Should We Drink Fridge Cold Water: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि हायड्रेशनसाठी कितीही अन्य उपाय केले तरी पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळा सुरु झाल्यावर सर्वांनाच गार गार पाणी प्यावेसे वाटू शकते. पण उन्हाळ्यात फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फ्रिजमधले थंड पाणी आरोग्यावर काय आणि कसा परिणाम करते ते जाणून घेऊया.
फ्रिजमधले थंड पाणी प्यायल्याने शरीरात नेमकं काय होतं?
जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये वासोस्पॅझम नावाची आजाराला आमंत्रण देणारी स्थिती उद्भवण्याची भीती असते. असे डॉ.(कर्नल) मंनजिनदार संधू यांनी सांगितले आहे.काही वेळेला अचानक आपण फ्रिजमधले थंड पाणी खूप जास्त प्रमाणात पितो. त्यात एकदा का उन्हाळा चालू झाला आणि उष्णता वाढली की मग फ्रिजमधले पाणी जास्तच प्रमाणात प्यायले जाते. परंतु हे पाणी प्यायल्याने आपल्याला घश्याबरोबरच हृदयाचे सुद्धा आजार उद्भवू शकतात .
हृदयविकार असलेल्या लोकांवर काय परिणाम होऊ शकतो-
खर तर सुरुवातीपासून हृदयाचा त्रास असणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते. अशा लोकांनी थंड पाणी प्यायल्याने त्यांना वासोस्पॅझम होऊ शकतो/ त्याचबरोबर हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी थंड पिताना काळजी घेणे गरजेचे आहे.
वासोस्पॅझम म्हणजे काय ?
आता मुळात वासोस्पॅझम म्हणजे काय? तर ज्यावेळी आपल्या रक्तवाहिन्या बंद होऊन रक्तप्रवाह थांबला जातो त्या स्थितीला वासोस्पॅझम असे म्हणतात. यामुळे सर्दी होण्यापासून ते हृदयविकाराचा झटका, चक्कर येणे, छातीत दुखणे अशी वेगवेगळ्या तीव्रतेची लक्षणे दिसू शकतात. यामुळे हातापायांमध्ये सतत मुंग्या आल्याचे वाटते.
हे ही वाचा<< वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्रॅम हिरवी मिरची खावी? तज्ज्ञांनी सांगितले व फायदे व योग्य पद्धत
थंड पाणी कधी व कसे प्यावे?
शरीराच्या तापमानात समतोल राखण्यासाठी साधे पाणी प्यायला हवे. यावर अगदीच सोयीचा पर्याय म्हणजे माठातील थंड पाणी पिणे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या तापलेल्या वातावरणातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका निदान १० ते १५ मिनिटे शरीर घरातील तापमानात स्थिर होऊद्या मग थंड पाणी प्या.