Healthy Toothpest : तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता? आपल्यापैकी अनेकांना वाटू शकते की, सर्व टूथपेस्ट एकसारखे असतात आणि सुरक्षितसुद्धा असतात. खरंच तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली आहे का? बऱ्याच टूथपेस्टमध्ये एक सामान्य घटक असतो, तो म्हणजे सोडियम लॉरील सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) ज्याचे फायदे कमी, पण तोटे जास्त आहेत.

निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. जॅनिन बोअरिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या सांगतात, “सोडियम लॉरील सल्फेट समाविष्ट असलेले टूथपेस्ट कधीही वापरू नका; तुमच्या टूथपेस्टचे लेबल तपासा.”

five powerhouse superfood is helpful for good for blood health
Superfood For Blood Health : रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी हे पाच सुपरफूड्स ठरतील फायदेशीर
Important aspects of bike maintenance
बाईक मेंटेनन्सच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष
Every women's should have these apps for safety
सुरक्षा महत्त्वाची! महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हे’ Apps प्रत्येकीकडे हवेतच
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
side effects of vitamin c
‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
five tips to increase the fuel efficiency of your sports bike
तुमच्या स्पोर्ट्स बाईकची इंधन क्षमता वाढविण्यासाठी फॉलो करा ‘या’ पाच सोप्या टिप्स…
Never Eat These Food Items With Tea
चहाच्या घोटासह चुकूनही खाऊ नका हे ६ पदार्थ; अचानक पोटात पित्त का वाढतं हे आहार तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया

पाहा व्हिडीओ

कोलकाता येथील डेंटल इम्प्लांटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डेंटिस्ट, मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि कोलकाता येथील एस्थेटिक क्लिनिकचे संचालक डॉ. कमलेश कोठारी सांगतात, “सोडियम लॉरील सल्फेट (SLS) हे एक डिटर्जंट आणि सर्फेक्टंट आहे, जे सहसा वैयक्तिक काळजी घेताना आणि घरगुती किंवा सार्वजनिक स्वच्छता करताना वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये असते. हे दात आणि हिरड्यांमधून घाण काढून टाकण्यास मदत करतात. तरीसुद्धा काही लोकांना सोडियम लॉरील सल्फेटमुळे चिडचिड जाणवू शकते, म्हणून सोडियम लॉरील सल्फेट समाविष्ट नसलेले अनेक टूथपेस्ट पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध आहेत.”

हेही वाचा : लाल चेरी मधुमेहासह ‘या’ तीन समस्यांवर ठरेल रामबाण उपाय; किती व कधी खाल्ली पाहिजेत? पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या

डॉ. कोठारी सांगतात, “सोडियम लॉरील सल्फेटयुक्त टूथपेस्ट वापरल्याने काही व्यक्तींना चिडचिड किंवा सेन्सिटिव्हीटी जाणवू शकते, सोडियम लॉरील सल्फेटमुळे तोंडाच्या आतील त्वचेला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तोंडामध्ये फोड येऊ शकतो किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.”

ते पुढे सांगतात, “क्वचितप्रसंगी काही लोकांना याची ॲलर्जी असू शकते. अंगावर सूज येणे किंवा खाज सुटणे इत्यादी गंभीर लक्षणे जाणवू शकतात. सोडियम लॉरील सल्फेट कर्करोगजन्य असल्याचे काही अभ्यासात सांगितले आहे, पण सोडियम लॉरील सल्फेटचा कर्करोगाशी संबंध असलेला असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.”

यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA), युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) आणि कॉस्मेटिक इंग्रेडियंट रिव्ह्यू (CIR) यासह प्रमुख आरोग्य आणि नियामक संस्थांनी SLS च्या सुरक्षिततेविषयी मत मांडले आहे.

“सोडियम लॉरील सल्फेटमुळे दातांमध्ये त्रास वाढू शकतो आणि सेन्सिटिव्ह दात किंवा हिरड्या असलेल्या व्यक्तींना आणखी त्रास होऊ शकतो. यामुळे हिरड्यांमध्ये लालसरपणा किंवा सूज येणे आणि अस्वस्थता जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात”, असे डॉ. कोठारी सांगतात.

डॉ. कोठारी यांनी दातांच्या निरोगी आरोग्यासाठी खालील टिप्स सांगितल्या आहेत.

सोडियम लॉरील सल्फेट नसलेले टूथपेस्ट निवडा. त्यासाठी टूथपेस्ट खरेदी करताना त्यावरील लेबल तपासा.

सतत दातांचा किंवा हिरड्यांचा त्रास होत असेल तर या विषयी डेंटिस्टचा सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या दातांच्या गरजेनुसार योग्य टूथपेस्टचा सल्ला देऊ शकतात.

दातांचा त्रास होऊ नये म्हणून दातांची आणि तोंडाची नीट स्वच्छता राखा.

“डाबर रेड पेस्ट, विको वज्रदंती, बेंटोडेंट यांसारख्या काही टूथपेस्ट आणि सेन्सोफाइन, मामाअर्थ आणि परफोरा या कंपन्यांच्या टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरील सल्फेट नसते”, असे डॉ. कोठारी सांगतात.