Can Using Tap Water Cause Skin Problems : सकाळी उठल्यावर, बाहेरून आल्यावर, तर कधी झोप आली म्हणून आपण लगेच नळाद्वारे येणारे पाणी ओंजळीत घेऊन तोंडावर, डोळ्यांवर मारण्यास सुरुवात करतो. नळाच्या पाण्यानं चेहरा धुणं निरुपद्रवी वाटू शकतं; पण असं करणं तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. बहुतेक शहरी नळाच्या पाण्यात क्लोरिन, खनिजे आणि अशुद्धता असते, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. कालांतराने, या दैनंदिन सवयीमुळे कोरडेपणा, जळजळ किंवा अगदी मुरमेदेखील येऊ शकतात, विशेषतः संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींमध्ये…
पण, नळाचे पाणी त्वचेला कसे नुकसान पोहोचवते?
त्वचातज्ज्ञ डॉक्टर नवजोत अरोरा यांच्या मते, संवेदनशील किंवा चेहऱ्यावर मुरमे असणाऱ्या मंडळींसाठी नळाचे पाणी थेट चेहऱ्यावर लावल्याने कधी कधी फायद्यापेक्षा जास्त नुकसानदाियी होऊ शकते.
नळाच्या पाण्यात क्लोरिन, फ्लोराईड व निर्जंतुकीकरणासाठी वापरली जाणाऱ्या इतर रसायने असतात. पण, ते त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा, जळजळ आणि लालसरपणा येतो. मुरमे येणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्यावर या रसायनांचा वाईट परिणाम होतो. या रसायनांमुळे त्वचेवर सूज वाढते. त्वचेचं संरक्षण कमजोर होते. त्यामुळे जळजळ वाढते, अधिक मुरमे येतात, जंतुसंसर्ग आणि चेहरा चिडचिडा होतो.
नळाच्या पाण्यातील अशुद्धता हेच जंतुसंसर्ग आणि मुरमांचे मुख्य कारण असते. तर, आता समजून घेऊया की, नळाच्या पाण्यातील अशुद्धता, रसायने किंवा खनिजे कालांतराने त्वचेच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात ते…
डॉक्टर अरोरा म्हणतात की, कालांतराने नळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखी अशुद्धता आणि कठीण खनिजे त्वचेवर जमा होऊ शकतात. त्यामुळे निस्तेजपणा, खडबडीत पोत, जड पाणी असल्यामुळे चेहऱ्यावरील फेसवॉश नीट धुऊन निघू देत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर त्याचे थोडे अवशेष राहून जातात आणि त्यामुळे त्वचारंध्रं (छिद्रं) बंद होतात आणि त्यामुळे मुरमे किंवा त्वचेचे इतर त्रास होऊ शकतात.
या खनिजांमुळे निर्माण होणारे pH संतुलन बिघडते आणि त्वचेच्या संरक्षण कवचाला नुकसान पोहोचवू शकते; ज्यामुळे अकाली वृद्धत्व, संवेदनशीलता वाढणे, एक्झिमा किंवा त्वचारोगासारख्या समस्या उद्भवू शकतात. सतत जर अशा पाण्याचा वापर केला, तर चेहऱ्यावर ताण, खाज आणि त्वचा कोरडी वाटू शकते. त्यामुळे नंतर मॉइश्चरायझर्स वापरूनही त्वचेला आराम मिळत नाही.
डॉक्टर अरोरा यांनी पुढे जोर दिला की, त्वचेचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात.
त्वचेचे प्रकार कोणते?
१. कोरड्या, संवेदनशील किंवा चेहऱ्यावर मुरमे असलेल्या मंडळींना नळाच्या पाण्यामुळे जळजळ होण्याचा त्रासाची शक्यता जास्त असते.
२. रोसेसिया, एक्झिमा किंवा सोरायसिससारख्या त्वचेच्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांना विशेषतः नळाच्या पाण्यासपासून सावध राहावे. कारण- त्यामुळे असुरक्षितता निर्माण होते.
३. तेलकट त्वचा असणाऱ्यांना सुरुवातीला नळाचे पाणी चांगले वाटू शकते. पण, कालांतराने, हळूहळू pH संतुलन बिघडल्यामुळे आणि त्वचेची छिद्रे बंद झाल्यामुळे त्वचेवर ब्रेकआउट्सचा (असंतुलन, मुरमे आणि इतर त्रास) अनुभव येऊ शकतो.
अशी त्वचा असणारी मंडळी डॉक्टरांनी शिफारस केलेल्या पर्यायी दैनंदिन फेस-क्लींजिंग उत्पादनांचा वापर करू शकतात…
१. मायसेलर वॉटर, थर्मल स्प्रिंग वॉटर किंवा फिल्टर केलेले पाणी हे चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य पर्याय आहेत. मायसेलर वॉटर त्वचेच्या नैसर्गिक अडथळ्याला त्रास न देता, घाण आणि मेकअप काढून टाकते.
२. थर्मल स्प्रिंग वॉटरमध्येदेखील भरपूर खनिजे असतात जी जळजळ कमी करतात आणि संतुलन पुनर्संचयित करतात.
३. वॉटर प्युरिफायर किंवा वॉटर सॉफ्टनर वापरल्याने नळाच्या पाण्यातील कडकपणा आणि अशुद्धता कमी करता येते.
सर्वोत्तम परिणामांसाठी चेहरा धुतल्यावर pH संतुलित टोनर, योग्य मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे त्वचा निरोगी, मऊ व हायड्रेटेड राहते.
