How much sleep is necessary for men and women: चांगल्या आरोग्यासाठी ७-८ तासांची शांत झोप खूप महत्त्वाची आहे. चांगली झोप रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला रोगांपासून वाचवते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की चांगली झोप शरीराला रिजनरेट, रिकव्हर करण्यास मदत करते. काही लोकांना तणाव, स्लीप एपनिया, डिहायड्रेशन, रात्री कॅफिनचे अतिसेवन आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेचा त्रास होतो.

काही लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि टीव्ही पाहतात, त्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही. तुम्हाला माहिती आहे की रात्री कमी झोपेमुळे तुमचे आरोग्य बिघडते. झोपेच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका, मानसिक समस्या, मधुमेह, स्तनाचा कर्करोग आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका जास्त असतो.

जग्गी वासुदेव ज्यांना सद्गुरू म्हणूनही ओळखले जाते. सद्गुरु हे लेखक आहेत आणि ईशा फाऊंडेशन नावाच्या मानव सेवा संस्थेचे संस्थापक आहेत, त्यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की जर तुम्ही निरोगी असाल आणि फक्त तीन ते चार तास झोपत असाल ही परिस्थिती चांगली आहे, परंतु जर तुम्ही कमी झोपत असाल आणि मानसिक समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हाला ७-८ तासांची झोप आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही, परंतु कमी झोपल्याने तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी पडत असाल तर तुम्हाला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता आहे.

( हे ही वाचा: महिनाभर फक्त ‘हा’ रस प्यायल्याने युरिक ॲसिडची समस्या झपाट्याने कमी होईल? सेवनाची पद्धत जाणून घ्या)

झोप न येणे हा एक आजार आहे

हकीम सुलेमान खान तूर, एक परवानाधारक हर्बलिस्ट आणि निसर्गोपचार डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितले की, कमी झोप येणे हा एक आजार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर जवसाच्या बियांची पावडर आणि काळा डिंक घ्या. या दोन्हीची पावडर करून घ्या. एक चमचा जवसाच्या पावडरमध्ये चिमूटभर काळा डिंक मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन करा, रात्री झोप यायला सुरुवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा झोपेचा सोपा तक्ता

नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, झोपेची गरज वयानुसार कमी होते आणि वाढते. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याला जास्त झोप लागते. नवजात बाळापासून ते ६० वर्षांपर्यंत किती झोपेची गरज आहे ते जाणून घेऊया.

नवजात बाळ २ ते १६ तासांची झोप आवश्यक आहे
१ ते २ वर्षाच्या बाळाची झोप ११ ते १४ तासांची झोप आवश्यक आहे
३ ते ५ वर्षाचे लहान मूल १० ते १३ तासांची झोप आवश्यक आहे
६ ते ९ वर्षाचे मूल ९ ते १२ तासांची झोप आवश्यक आहे
किशोरवयीन मुले आणि मुली ८ ते १० तासांची असते, जी रुटीननुसार कमी जास्त होऊ शकते
१८ ते ६० वयोगटातील लोकांची झोप १८ वर्षाच्या वरील लोकांना ७ तासांची झोप आवश्यक आहे.
तसच ६० वर्षाच्या वरील लोकांना कमीतकमी ८ तासांच्या झोपेची आवश्यकता आहे