how to clean brass Utensils tips : घरामध्ये ठेवलेली पितळ्याची जुनी भांडी, डबे किंवा सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या पाण्याच्या पितळी बाटल्यांना झटपट स्वच्छ कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? मग स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून काही मिनिटांमध्ये पितळी भांडी चमकावण्याच्या पाच सोप्या टिप्स पाहा.

१. लिंबू आणि मीठ

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

लिंबू आणि मीठ या दोन गोष्टी आपण अनेकदा भांडी चमकावण्यासाठी वापरत असतो. मात्र पितळ्याच्या भांड्यावरदेखील या गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो. लिंबामधील घटक भांड्यांवरील डाग किंवा काळपटपणा घालवण्यास मदत करत असतात. त्यामुळे पितळी भांड्यावर याचा उपयोग कसा करायचा ते पाहू.

सर्वप्रथम अर्धे चिरलेल्या लिंबावर थोडे खडे मीठ लावावे. आता या लिंबाचा उपयोग करून, पितळी भांडी हलक्या हाताने घासून घ्यावे. पितळीभंडी घासून झाल्यावर भांडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

हेही वाचा : Kitchen tips : मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी? काय करावे, काय नको पाहा

२. व्हिनेगर आणि मैदा

पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी आणि मैद्याचादेखील उपयोग करता येऊ शकतो. व्हिनेगरमधील आम्लता, मैद्याच्या सौम्यतेमुळे संतुलित होते.
यासाठी, व्हिनेगर-मैद्याची एक पेस्ट तयार करून घ्यावी. यासाठी, व्हिनेगर [व्हाईट व्हिनेगर] आणि मैदा यांचे समान भाग एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्यावे. तयार झालेली ही पेस्ट तुमच्या पितळेच्या भांड्यांना लावून घ्या. भांड्यावर सगळीकडे ही पेस्ट एकसमान पसरेल याची काळजी घ्यावी.
भांड्यावर ही पेस्ट १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवावी. त्यांनतर भांडी कोमट पाण्याचे स्वच्छ करून घ्या.
एका कोरड्या फडक्याने पितळी भांडी पुसून घ्यावे.

३. बेकिंग सोडा आणि लिंबू

स्वयंपाक घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी सर्वात उपयुक्त अशा दोन गोष्टी म्हणजे लिंबू आणि बेकिंग सोडा. अनेकदा पितळी भांड्यांवर चिवट डाग असतात. ते सहजतेने काढण्यासाठी आपल्याला बेकिंग सोड्याचा आणि लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. तो कसा करावा ते पाहू.
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा समप्रमाणात घ्या.
दोन्ही गोष्टी मिसळून एक पेस्ट बनवून तयार करा.
आता पितळी भांड्यांवरील चिवट डागांवर ही तयार पेस्ट अर्ध्या तासासाठी लावून ठेवा.
नंतर कोमट पाण्याच्या मदतीने भांडी स्वच्छ करून घ्यावी.
तुमची भांडी नव्यासाठी चमकू लागतील.

हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स

४. टोमॅटो सॉस

हा उपाय ऐकून अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र टोमॅटो सॉसदेखील पितळी भांडीदेखील उजळू शकतात. यासाठी काय करावे ते पाहा.
सर्वात पहिले एका कापडावर किंवा स्पंजवर थोडासा टोमॅटो सॉस घेऊन त्याने पितळी भांडी हलक्या हाताने घासून, पॉलिश सारखे वापरावे.

५. तेल आणि व्हिनेगर

तेल आणि व्हिनेगर यांचा वापर करून तुम्ही पितळी भांड्यांसाठी पॉलिश बनवू शकता. त्यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात तेल आणि व्हिनेगर घ्यावे.
दोन्ही घटक व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिश्रण ढवळत राहावे. व्हिनेगर आणि तेल एकजीव झाल्यानंतर एक मऊ कापड या मिश्रणामध्ये बुडवून घ्यावे.
आता त्या कापडाच्या मदतीने पितळी भांड्यावर व्हिनेगर आणि तेलाचे मिश्रण लावून घ्यावे.
व्हिनेगरमुले भांड्यावरील चिवट डाग निघून जाण्यास मदत होऊ शकते.

या सोप्या घरगुती उपायांसह पितळी भांडी चमकावण्याच्या टिप्स एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजतात.