Viral Video : सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. दिवसभर आठ नऊ तास एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. दिवसभराचा हा थकवा कसा कमी करायचा, चला तर जाणून घेऊ या.योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी दिवसभराचा थकवा दोन मिनिटांमध्ये कसा घालवायचा, हे सांगितले आहे.

योग अभ्यासक मृणालिनी यांनी सांगितल्याप्रमाणे –

दिवसभराचा थकवा आणि ताणतणाव दूर करण्यासाठी दोन मिनिटे एका स्थितीत राहण्यास सांगितले आहे. मृणालिणी यांनी बेडवर झोपण्याची एक अनोखी पद्धत सांगितली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर एका स्थितीत दोन मिनिटे बेडवर झोपत असाल तर तुमचा दिवसभराचा थकवा कमी होतो. यामुळे मानदुखी कमी होते, मन शांत होते, श्वसन सुधारते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे, चक्कर येते, स्पाँडिलिसिसचा त्रास आहे त्यांनी हे करू नये”

मृणालिनी सांगतात, “याचा नियमित दोन मिनिटे तरी सराव करावा. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. हळू हळू मन शांत होऊन झोप लागण्यास मदत होईल. यामुळे सर्व इंद्रियाचा थकवा दूर होतो , शारीरिक थकवा कमी होऊन शरीर शांत आणि स्थिर होते व दिवसभर वापरलेला मेंदू शांत होण्यास मदत होते व त्यामुळे झोपेतून उठल्यावर शांत वाटते व एकदम उत्साही वाटते.

हेही वाचा : Winter Blues : हिवाळ्यात उदासपणा का जाणवतो? ‘या’ गोष्टी असू शकतात कारणीभूत; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

त्याचबरोबर त्या पुढे सांगतात –

१. झोपण्यापूर्वी १ तास मोबाईल व टीव्ही बघू नका/ गंभीर विषयाची चर्चा करू नका
२. रात्री 7.30-8च्या आत जेवण करा
४. जेवल्यानंतर शतपावली करा
५. झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवा/ १० मिनिटे कोमट पाण्यात पाय घालून बसा
६. तळपायाला तेलाने मसाज करा
७. झोपताना स्ट्रेचिंग आणि ध्यान करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पण करतो. डोक्याला रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढून फ्रेश होते.” तर एका युजरने लिहिलेय, “छान माहिती” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खरंय.”