scorecardresearch

फ्रोजन भाज्यांबाबतच्या ‘या’ चुका ठरतात नुकसानकारक; वेळीच जाणून घ्या

फ्रोजन भाज्या साठवताना कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या

फ्रोजन भाज्यांबाबतच्या ‘या’ चुका ठरतात नुकसानकारक; वेळीच जाणून घ्या
फ्रोजन भाज्या साठवण्याची योग्य पद्धत (Photo: Freepik)

भाज्या खुप काळ टिकवून ठेवण्यासाठी फ्रोजन पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर करुन एखादी भाजी अनेक महिन्यांसाठी साठवली जाऊ शकते. अनेकजण अशा फ्रोजन भाज्यांचा वापर करतात. पण या भाज्या साठवताना नीट काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही अनेकांना फ्रोजन भाज्यांमधून वास येतो किंवा त्यांच्यातली पौष्टिकता कमी होते अशी तक्रार करताना पाहिले असेल. या समस्येवरील उपाय म्हणजे या भाज्या साठवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.

भाज्या डीफ्रोस्‍ट करा
जर तुम्ही अत्यंत कमी तापमानात भाज्या साठवत असाल तर त्यांना फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर डीफ्रोस्‍ट करणे गरजेचे असते. डीफ्रोस्‍ट करणे म्हणजे भाज्या सामान्य तापमानाला ठेऊन त्यांचे तापमान सामान्य करणे. यामुळे त्यांना शिजवण्याचा वेळही वाचतो.

आणखी वाचा: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

उकळू नका
काहीजणांना फ्रोजन भाज्या बनवण्याआधी उकळण्याची सवय असते. ही अत्यंत चुकीची सवय आहे. फ्रोजन भाज्यांना स्टीम किंवा मायक्रोवेवमध्ये गरम करण्याचीही गरज नाही. कारण असे केल्याने भाज्या जास्त शिजण्याची आणि परिणामी त्यांचे टेक्सचर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रोजन भाज्या उकळू नका.

गरजेपेक्षा जास्त दिवस साठवणे
भाज्यांना व्यवस्थित सील पॅक करून साठवल्यानंतर त्या अनेक दिवस टिकतात. पण सील पॅक उघडल्यानंतर जास्त दिवस भाज्या साठवणे टाळावे. कारण सील पॅक उघडल्यानंतर भाज्या लगेच सुकण्याची आणि त्यांची चव बिघडण्याची शक्यता असते. जर पॅकेट मधल्या भाज्या असतील तर त्यावरील एक्सपायरी डेट आठवणीने तपासा.

आणखी वाचा: स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित; लॅन्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष

फ्रोजन भाज्यांचा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवा
फ्रोजन भाज्या लगेच वापरायच्या असतील तर फ्रीजमधून काढल्यानंतर त्या साध्या पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर थोडा वेळ पाण्यात ठेवा. १० मिनिटांनंतर पाण्यातून काढून सुकवून वापरू शकता. या भाज्यांवर जमा होणारे एंजाइम्स डीएक्टिव करण्यासाठी ही पद्धत वापरणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 16:59 IST

संबंधित बातम्या