अनेकांचे दात लहानपणापासूनचं वाकडे तिकडे असतात, त्यामुळे हे दात चांगले आणि योग्य आकारात हवे असे प्रत्येकाला वाटते. अशावेळी अनेकजण दातांना सरळ करण्यासाठी तार म्हणजे Braces लावतात. पण Braces मुळे तोंडाला घाणेरडा वास येतो, अनेकदा दातांमध्ये तीव्र वेदना होतात जे खूप त्रासदायक असते. अशा परिस्थितीत वाकडे-तिकड्या दातांना लपवण्यासाठी एक सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्याला Invisalign aligners असे म्हणतात. याच्या वापरामुळे दात वाकडे तिकडे दिसतही नाही आणि दातांची कोणती समस्याही जाणवत नाही.
सध्या सोशल मीडियावरही Invisalign aligners च्या अनेक जाहिराती दिसतात. तर रस्त्यावरही मोठे होर्डिंग्स दिसतात. अनेक कंपन्या सध्या Invisalign aligners ची निर्मिती करत आहेत. पण या उद्योगातील मार्केट लीडर Invisalign नावाची यूएस कंपनी आहे. अगदी Xerox प्रमाणे कंपनीचे नाव देण्यात आले आहे, कारण ही कंपनी कोणत्याही प्रकारच्या दातांचा एक हुबेहुबे फिड होणारा साचा बनवून देते.
पूर्वी वाकड्या-तिकड्या दातांसाठी Braces हा एकच पर्याय होता. पण त्याच्या वापरामुळे जाणवणाऱ्या समस्याही खूप होत्या, दोन वर्षे Braces दातांवर फिड केल्या जातात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील एक स्मित हास्य गायब व्हायचेय. अशा परिस्थितीत aligners च्या वापरामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळत आहे. पण aligners वापरणे कसे फायदेशीर आहे हे जाणून घेऊ…
स्माइल डिझाइन स्पेशलिस्ट, प्रोस्थोडॉन्टिस्ट, इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. दीक्षा ताहिलरमानी बत्रा यांनी aligners वापरण्याचे ५ फायदे सांगितले आहे.
१) वापरण्यासाठी सोपे
क्लिअर अलाइनर किंवा टूथ अलायनर विशेष सामग्रीपासून तयार केलेला दातांचा ट्रे आहे. जो Braces सारखेच दात सरळ करण्यासाठी वापरला जातो. यामुळे Braces न घालताच दातांना योग्य आकार देता येतो. दातांच्या डिजिलट स्कॅननंतर तयार केलेले aligners वापरण्यासाठी सोप्पे असते. चांगली गोष्ट म्हणजे हे वापरण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. क्रॉसबाइट्स, ओपन बाइट्स, ओव्हर-जेट्स आणि बरेच काही यासारख्या गंभीर समस्यांवर उपचार करण्यासाठी क्लिअर aligners हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहेत.
२) खाण्यावर कोणतीही बंधने नाहीत
aligners हे काढण्यायोग्य असल्याने तुम्ही काहीही खाऊ शकता आणि परत घालू शकता. याची स्वच्छता आणि देखभाल अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. यासाठी दर दोन आठवड्यांनी याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही aligners जेवणादरम्यान बाहेर काढू शकता आणि तुम्हाला हवे ते खाऊ किंवा पिऊ शकता. पण Braces एकदा लावल्यानंतर पुन्हा लगेच काढता येत नाही.
३) दातांची समस्या जाणवत नाही
aligners वापरण्यास सोपे असल्याने तुमच्या दात, जीभ किंवा हिरड्यांना कोणतीही समस्या जाणवत नाही. प्रत्येक दाताच्या आकारानुसार याचा साचा तयार होत असल्याने कोणत्याही दुखापत होत नाही. यामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात aligners वापर दिवसेंदिवस वाढतोय. परंतु याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
४) तुटण्याची समस्या जाणवत नाही
जर योग्य खबरदारी घेतली नाही तर Braces ची वारंवार तुटतात.Braces अनेक वर्षे वापरावे लागत असल्याने ते तुटण्याचा घटना वारंवार घडतात. परंतु aligners हे डिजिटल पद्धतीने अचूकपणे तयार केले जातात, ज्यामुळे गंभीर परिस्थितीतही ते तुटण्याची शक्यता फार कमी असते.
५) डिजिटल आणि प्रेडिक्टेबल
aligners ही उपचार पद्धती पूर्णपणे CAD CAM तंत्रज्ञानासह डिजिटल पद्धतीने तयार केलेली आहे. यामुळे मानवी चुका न होता कमी वेळेच उपचार करता येतात. ऑर्थोडॉन्टिस्टच्या कौशल्यावर अवलंबून असलेल्या पारंपारिक Braces च्या विरोधात ही उपचार पद्धती योग्य मानली जाते.