अंजीर हे कोरड्या फळांपैकी एक आहे. बरेच लोक ते रिकाम्या पोटी खातात परंतु अनेकांना उन्हाळ्यात ते खाणे आवडत नाही कारण अंजीर गरम असते. असेही मानले जाते की उन्हाळ्यात अंजीर खाल्ल्याने शरीराला हानी होते. उन्हाळ्याच्या हंगामात अशा ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे तुम्हाला चविष्ट तर वाटतेच, शिवाय पोषण आणि हायड्रेशनची कमतरताही पूर्ण होते. अशा ड्राय फ्रूट्समध्ये अंजीरचे नाव पहिले घेतले जाते. अंजीर शतकानुशतके वापरले जात आहे. उन्हाळ्यात लोक अंजीर मोठ्या उत्साहाने खातात.
मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, या हंगामात कोरडे अंजीर खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात अंजीर खावे की नाही ते जाणून घेऊया.
अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लोक ते पाण्यात भिजवून खातात. अनेकांना सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यात अंजीर खायला आवडते. अंजीरमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन बी-6 मुबलक प्रमाणात आढळतात. अंजीरमध्ये अँटिऑक्सिडेंट्स देखील असतात जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप मदत करतात. अंजीर हे उष्ण स्वरूपाचे आहे, त्यामुळे बहुतेक लोक उन्हाळ्यात ते खात नाहीत. उन्हाळ्यात जास्त अंजीर खाल्ल्याने पोटदुखी आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते असे अनेक अहवालातून समोर आले आहे.
अंजीर पाण्यात भिजवून खावे
अंजीर हे उष्ण असते, त्यामुळे उन्हाळ्यात ते पाण्यात भिजवून खावे. खाण्याची ही पद्धत आहे. सर्व प्रथम ४-५ अंजीर घ्या आणि नंतर एक कप पाण्यात रात्रभर भिजवा. भिजवलेल्या अंजीरांचा प्रभाव थंडावा देणारा होतो. मग तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी आरामात खाऊ शकता.
हेही वाचा >> तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?
अंजीर दुधात भिजवून खाण्याचे फायदे
दुधात भिजवलेले अंजीर खाल्ल्याने त्यातील पोषक तत्व अनेक पटींनी वाढतात. दुधात भिजवल्याने त्याचा प्रभावही थंड होतो. याशिवाय दुधात भिजवलेले अंजीर देखील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
अंजीर घालून स्मूदी बनवा
अंजीर खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यातून स्मूदी बनवणे. अंजीराचे २-३ तुकडे घेऊन स्मूदी बनवा. अंजीर दुधात किंवा पाण्यात २-३ तास भिजवून मग स्मूदी बनवा. हे खाल्ल्याने अनेक फायदे होतात.