स्वयंपाकघरातील सर्वाधिक वापरता येणारी जागा म्हणजे सिंक. अशा स्थितीत सिंकमध्ये सतत भांडी घासून त्यात इतके हट्टी डाग जमा होतात की, ते काढण्यासाठी सामान्य पाणी आणि साबण पुरेसा नसतो. याशिवाय सिंकमध्ये नेहमी पाणी साचत असेल तर ते गंजते किंवा डागांमुळे काळवंडण्याची शक्यता असते. अशा प्रकारामुळे सिंकची चमक खराब होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा एका उपायाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टीलचा सिंक पुन्हा
नव्यासारखा चमकवू शकता.

किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ काम

सिंकमधील हट्टी डाग काढून टाकण्यापूर्वी सर्वात पहिली एक गोष्ट करा, ती म्हणजे सिंक पूर्णपणे रिकामी करून घ्या. यानंतर कोमट पाण्यात मीठ मिसळा आणि सिंक धुवून घ्या. यामुळे सिंकमधील घाणीचा जाड थर थोडा सैल होईल, ज्यामुळे स्वच्छता करणे सोपे होईल.

सिंकमध्ये शिंपडा बेकिंग सोडा

किचन सिंकमध्ये मिठाचे कोमट पाणी टाकल्यानंतर त्यात बेकिंग सोडा शिंपडा. यानंतर २० ते ३० मिनिटे असेच राहू द्या. बेकिंग सोडा एक चांगला क्लिनिंग एजंट म्हणून काम करतो. यामुळे किचन सिंकमधील हट्टी डाग काढणे सहज सोपे होते.

सिंकचा पृष्ठभाग नीट घासून घ्या

आता किचन सिंकमध्ये टाकलेल्या बेकिंग सोड्यावर हलके पाणी ओता आणि स्क्रब करा. यामुळे सिंकमधील घाण आणि डागांचा थर निघू लागेल. यावेळी पाण्याचा जास्त वापर करू नये. सिंक चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्यासाठी तु्म्ही पाण्याऐवजी व्हिनेगरदेखील वापरू शकता. यानंतर संपूर्ण सिंक पाण्याने स्वच्छ करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंक चमकण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

सिंक स्वच्छ केल्यानंतर एकदम चकचकीत ठेवण्यासाठी त्यावर ऑलिव्ह ऑईल लावू शकता. यासाठी एका सुती कपड्यात थोडं तेल घेऊन सिंक नीट चोळा. हे करण्यापूर्वी सिंक पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा.