Potatoes Store Easy Tricks For Monsoon : तुमच्यापैकी अनेकांना बटाट्यापासून बनविलेले विविध पदार्थ आवडत असतील; जसे की, फ्रेंच फ्राइज, बटाट्याचे चिप्स ते बटाट्याची भजी अन् भाजी. इतकेच नाही, तर विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही बटाटा टाकला जातो आणि त्यामुळे बटाटा हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु, बटाटे जास्त दिवस ताजे, सुरक्षित ठेवणे हे आव्हानात्मक काम असते. कारण- बटाट्यांना काही दिवसांतच कोंब फुटतात. इतकेच नाही, तर ओलसर ठिकाणी राहिल्यास ते लवकर सडून खराब होतात. तुमची ही बटाटे लवकर खराब होण्याची चिंता दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून बटाटे तीन महिने चांगल्या स्थितीत टिकवून ठेवू शकता.

बटाटे कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या पॅकिंगमध्ये ठेवणे योग्य आहे आणि कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत हे आम्ही तुम्हाला सांगू. त्या योग्य स्टोअरेज टिप्सचा वापर करून तुम्ही बटाटे जास्त दिवस टिकवून ठेवू शकता.

बटाटे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

१) बटाटे इतर भाज्यांमध्ये ठेवू नका

अनेकांना काही भाज्यांमध्येच बटाटे ठेवण्याची सवय असते; पण ही एक चुकीची सवय आहे. बरेच लोक बटाटे आणि कांदे एकत्र ठेवतात; परंतु असे करणेदेखील योग्य नाही. कांद्यांमधून इथिलीन वायू बाहेर पडत असतो आणि त्यामुळे त्यात बटाटे ठेवल्यास ते लवकर खराब होतात.

त्यामुळे कांदा, लसूण, टोमॅटो या भाज्यांमध्ये बटाटे ठेवू नका. या भाज्यांमध्ये जास्त आर्द्रता असते आणि त्यामुळे बटाटे लवकर सडण्याची आणि खराब होण्याची शक्यता अधिक असते.

२) बटाटा बरेच दिवस कसे साठवून ठेवायचे?

बटाटे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी ते नेहमी मोकळ्या व हवेशीर जागी; परंतु सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. कारण- जास्त प्रकाशामुळे बटाटे हिरवे होऊन क्लोरोफिल तयार करू शकतात; ज्यामुळे त्यांना कडू चव येते आणि त्यात सोलॅनिन नावाचा विषारी पदार्थ तयार होतो.

बटाटे बंद खोली किंवा स्वयंपाकघरातील कोपरा अशा ठिकाणी ठेवा की, जेथे कमी ओलसरपणा असेल. बटाटे चांगल्या हवेशीर असलेल्या ठिकाणी साठवून ठेवल्याने त्यामध्ये ओलावा जमा होत नाही आणि त्यामुळे बटाटे बराच काळ ताजे राहतात.

हेही वाचा – Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोनं खरेदीचा विचार करताय? मग पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर

३) बटाटे कसे पॅक करावे?

बटाटे साठविण्यासाठी कागदाच्या पिशव्या, जाळीदार पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापरा करा. प्लास्टिक पिशव्या वापरू नका. कारण- त्यामुळे नीट हवा न मिळाल्याने त्यांना पाणी सुटते. अशा ओलसर स्थितीत बटाटे लवकर खराब होऊ शकतात. पण तुम्ही बटाटे नीट अन् व्यवस्थित रीतीने साठवलेत, तर ते दोन-तीन महिने ताजे राहू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बटाटे व्यवस्थितरीत्या साठवून तुम्ही अन्नाची नासाडी टाळण्यासह तुमच्या किराणा मालावरील खर्चातही बचत करू शकता. या सोप्या स्टोअरेज टिप्स वापरून तुम्ही बटाटे ताजे ठेवून, त्यांचा दीर्घकाळ वापर करू शकता.