Kitchen Tips : आजकाल अनेक जण गरम पाणी पिण्यासाठी थर्मल किंवा गरम पाण्याची बाटली वापरतात. प्रवासादरम्यान गरम चहा ठेवण्यापासून ते विविध गोष्टींसाठी थर्मल किंवा अशा बाटलींचा वापर होतो. यात करोना काळापासून तर बहुतांश लोक गरम पाणी ठेवण्यासाठी थर्मल किंवा त्या क्वाॅलिटीची बाटली वापरतात. पण, ही बाटली धुवून ठेवली तरी त्यातून अनेकदा कुबट, विचित्र वास येऊ लागतो. अशावेळी त्यातील वास काढणे अवघड काम असते. पण, आम्ही काही स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने थर्मल किंवा बाटलीमधील कुबट वास काही मिनिटांत कमी करता येईल.
टिश्यू पेपरचा वापर करा
गरम पाण्याची बाटली बराच काळ वापरणार नसाल तरी तुम्ही ती नीट धुवून कोरडी करा, यानंतर त्यात टिश्यूचा गुंडाळून गोळा बनवून बाटलीच्या आत ठेवा. झाकण बंद करा. त्यामुळे तुम्ही बाटली कधीही उघडली तरी बाटलीतून वास येणार नाही.
खोबरेल तेलात ‘या’ तीन गोष्टी मिसळून लावल्यास पांढरे केस होतील काळे! जाणून घ्या डॉक्टरांचे मत
लवंग ठेवा
तुम्ही अशा बाटलीचा वापर गरम चहा, दूध, कॉफी किंवा गरम पाणी ठेवण्यासाठी करत असाल तर त्यातून खूप वेगाने वास येऊ लागतो. अशावेळी बाटली नीट न धुतल्यास त्यातून खूपच दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत बाटली लिक्विड सोपने नीट स्वच्छ धुवा आणि कोरडी करा, यानंतर त्यात दोन ते चार लवंग टाकून झाकण बंद करा, अशाने महिनाभरानंतरही तुम्ही बाटली उघडली तरी वास येणार नाही.
मीठ टाका
गरम पाण्याच्या बाटलीतील कुबट वास दूर करण्याची आणखी एक सोपी ट्रिक म्हणजे मीठ. याच्या वापराने बाटलीच्या आतून येणारा वास काही मिनिटांत दूर होऊ शकतो. यासाठी बाटली साबणाने नीट स्वच्छ करा. नंतर ती आतून कोरडी करून घ्या. आता त्यात एक चमचा मीठ घाला आणि झाकण बंद करून ठेवा.