भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते. पुन्हा एकदा एलआयसीने एक नवीन जीवन विमा पॉलिसी सादर केली आहे. या नवीन जीवन विमा पॉलिसीचे नाव ‘एलआयसी धन वर्षा योजना’ असे आहे. या अंतर्गत, ग्राहकांना दोन पॉलिसी अटी निवडण्याची ऑफर दिली जात आहे. या पॉलिसीमध्ये प्रीमियम एकदाच भरावा लागतो. यामध्ये ग्राहकांना गॅरंटीड मॅच्युरिटी, बोनस, प्रीमियमच्या दहापट रिस्क कव्हर यासह अनेक अतिरिक्त फायदे मिळणार आहेत.
एलआयसीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, धन वर्षा पॉलिसी ही जीवन विमा तसेच बचत योजना आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान या योजनेशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला रोख मदत दिली जाते. मुदतपूर्तीच्या तारखेला, ते उर्वरित आयुष्यासाठी पेमेंटची हमी देते.
धन वर्षा पॉलिसीचे फायदे
धन वर्षा पॉलिसी ही एक गैर-सहभागी, वैयक्तिक, बचत, एकल प्रीमियम जीवन विमा पॉलिसी आहे, जी ग्राहकांना संरक्षण तसेच बचतही देते. एलआयसीच्या यादीत धन वर्षा योजना ८६६ व्या क्रमांकावर आहे. ही योजना वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय योजनांसाठी उपलब्ध आहे.
एलआयसी धनवर्ष पॉलिसीमध्ये, ग्राहक त्यांची विमा रक्कम निवडू शकतात. यामध्ये, पॉलिसीच्या प्रीमियम रकमेच्या १० पट विमा रक्कम घेतली जाऊ शकते. या अंतर्गत, जर तुम्ही ही पॉलिसी ५० हजार रुपयांच्या प्रीमियमसाठी घेतली तर तुम्ही ५ लाख रुपयांची विम्याची पॉलिसी घेऊ शकता.
आणखी वाचा : रात्री गाढ झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो? ‘या’ कारणांमुळे उद्भवते समस्या
असे मिळणार लाभ
धन वर्षा पॉलिसी ही एकल योजना योजना आहे म्हणजेच या अंतर्गत तुम्हाला फक्त एक प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही या प्रीमियमच्या १० पट जोखीम कव्हर घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळतात. पहिला पर्याय निवडल्यावर, विमा रक्कम जमा केलेल्या प्रीमियमच्या १.२५ पट असेल. म्हणजेच, जर एखाद्याने १० लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम भरला असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल, तर नॉमिनीला हमी अतिरिक्त बोनससह १२.५ लाख रुपये मिळतील.
त्याच वेळी, योजनेच्या दुसऱ्या पर्यायामध्ये, जमा केलेल्या प्रीमियममधून १० पट जोखीम कव्हर मिळेल. म्हणजेच विमा घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर १० पट रोख मदत मिळेल. म्हणजेच १० लाख सिंगल प्रीमियम भरल्यास त्याच्या कुटुंबाला गॅरंटीड बोनससह १ कोटी रुपये मिळतील. तसेच, एलआयसीची धन वर्षा योजना हा प्लॅन फक्त ऑफलाइन उपलब्ध असेल. तुम्हाला या प्लॅनमध्ये दोन टर्म ऑफर केल्या जातात. एक १० वर्षांचा तर दुसरा १५ वर्षांचा आहे. तुम्ही यापैकी कोणतीही निवड करू शकता.
आणखी वाचा : दिवाळीत विकली जाणारी मिठाई भेसळयुक्त तर नाही ना? कसे ओळखायचे जाणून घ्या…
कोणाला घेता येणार लाभ?
एलआयसीच्या धन वर्षा पॉलिसीमधील दोन्ही पर्यायांमध्ये, जर तुम्ही १५ वर्षांच्या मुदतीची निवड केली असेल, तर पॉलिसी घेण्याचे किमान वय ३ वर्षे असेल. जर तुम्ही १० वर्षांची मुदत निवडली तर किमान वय ८ वर्षे असेल. दुसरीकडे, पहिल्या पर्यायामध्ये, तुमचे कमाल वय ६० वर्षे असावे आणि तुम्ही १० पट जोखीम संरक्षण घेत असाल, तर तुम्ही १० वर्षांच्या मुदतीसह ४० वर्षे वयापर्यंतच या योजनेत सामील होऊ शकाल. दुसऱ्या पर्यायामध्ये, जर तुम्ही १५ वर्षांची मुदत घेतली तर कमाल वय ३५ वर्षे असेल.