Milk with Raisins Benefits: दूध अनेकजण पितात. पण तुम्हाला माहित आहे का की दुधात असे काही पदार्थ मिसळून खाल्ल्यास त्याचे फायदे द्विगुणीत होतात. आज आम्ही तुम्हाला असाच एका गोड पदार्थांबद्दल सांगणार आहोत जो पदार्थ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो. जर तुम्हाला शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही दुधात मनुका मिसळून खाऊ शकता. याचे सेवन केल्यास अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. या शिवाय जर तुम्ही अॅनिमिया आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर मनुके खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय गरम मिसळून मनुकाचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात.

दुधापासून मिळणारे पोषकतत्व

दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि अनेक खनिजे आणि नैसर्गिक फॅटसह जीवनसत्त्वे ए, डी, के आणि ई देखील असतात. दुधामध्ये अनेक एंजाइम आणि काही जिवंत रक्तपेशी देखील असू शकतात, ज्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

मनुका पासून मिळणारी पोषकतत्वे

मनुकामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे अशक्तपणा जाणवणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होतो. याशिवाय यामध्ये कॉपर देखील असते, ज्यामुळे लाल रक्तपेशी तयार होतात आणि अॅनिमिया होत नाही. बेदाण्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी-कॉम्प्लेक्स आणि सेलेनियम असते जे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते

दूध आणि मनुका एकत्र खाण्याचे फायदे

रक्तदाब नियंत्रणात राहील

जर तुम्ही रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर मनुका तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बर्‍याच लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यामुळे त्यांना इतरही आजार होण्याची शक्यता असते. दूध आणि मनुका या दोन्हीमध्ये मुबलक प्रमाणात सोडियम असते. सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.

पचन चांगले होईल

आपण ज्या गोष्टी खातो त्याचे नीट पचन होणे महत्त्वाचे असते. यासाठी तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात फायबर पोहोचले पाहिजे. अशा परिस्थितीत मनुका आणि दुधाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते, कारण मनुका हे फायबरचा प्रमुख स्रोत आहे.

( हे ही वाचा: पोस्टमार्टम फक्त दिवसा केलं जातं रात्री का नाही? यामागील सत्य जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

विवाहित पुरुषांची ‘ताकद” वाढेल

दुधासोबत मनुका सेवन करणे विवाहित पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. एका संशोधनानुसार, मनुकामध्ये पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्याचा गुणधर्म असतो. शुक्राणूंची गतिशीलता वाढवण्याची क्षमता मनुकामध्ये असते. म्हणूनच गरम दुधासोबत मनुका घेण्याचा सल्ला दिला जातो.

डोळ्यांना फायदा होतो

मनुका आणि दूध एकत्र सेवन करणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात पॉलीफेनॉलिक फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे एक मजबूत अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतात आणि डोळ्यांच्या समस्यांपासून संरक्षण करतात.