Measles Symptoms and Treatment: सध्या मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. शहरात गेले अनेक दिवसात गोवर आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. केंद्र सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली असून, याचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून, या साथीचा फैलाव वाढलेल्या भागात पाहणी दौरा केला जाणार आहे.

मुंबईत प्रचंड वेगाने पसरते गोवरची साथ..

मुंबईत गोवरची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान १०९ रुग्णांची नोंद झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत या साथीचे ६० रुग्ण सापडले होते. तर काही दिवसांपूर्वीच मुंबई गोवंडीमधील एकाच कुटुंबाटील तीन बालकांचा या गोवरच्या साथीने मृत्यू झाला होता. ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

(हे ही वाचा : मीठ खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढू शकते का? आयुर्वेद तज्ज्ञाकडून जाणून घ्या काय आहे सत्य)

मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरू

मुंबईत गोवरच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता, महापालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. तसच ठिकठिकणी शिबिरे, लसीकरण करण्यास देखील सुरुवात झाली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम देखील राबवली जात असून, स्वच्छता राखण्याचे आणि लहान मुलांसाठी लसीकरण करण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. गोवर हा आजार विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक पाहिला जातो. तर काहीवेळा मोठ्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीला एकदा गोवर आजार झाल्यास पुन्हा तो त्या व्यक्तीला होत नाही.

गोवर आजाराची कारणे

गोवर हा साथीचा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. जर एखाद्याला या विषाणूचा संसर्ग झाल्यास, १० ते १२ दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवर आजाराची लागण झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यामधून विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला गोवर आजार होऊ शकतो.

( हे ही वाचा: बदामच नव्हे, तर शेंगदाणे देखील वाढवतात स्मरणशक्ती; फक्त ‘या’ प्रमाणात दररोज सेवन करा)

गोवर आजाराची लक्षणे

  • खोकला येणे
  • वाहती सर्दी किंवा उच्च ताप
  • डोळ्यांची जळजळ होणे
  • डोळे लाल होणे
  • घास दुखणे
  • तोंडात पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे
  • अंग दुखणे

ही वरील सर्व लक्षणे सुरुवातीला जाणवतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी चेहऱ्यावर आणि संपूर्ण अंगावर लालसर पुरळ उठतात.

( हे ही वाचा: सकाळी उठून फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; Blood Sugar Level राहील नियंत्रणात)

गोवर आजारावरील उपचार आणि उपाय

विशेष म्हणजे गोवर आजारावर कुठलाही उपचार नसून आवश्यक ती काळजी घेणं हा यावरचा उपाय आहे. याशिवाय रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरून यावर उपचार केले जातात. जसं की सर्दी, ताप, खोकला असल्यास त्यावर औषध किंवा गोळ्या दिल्या जातात. यावेळी रुग्णांनी या आजारापासून बरे होण्यासाठी आवश्यक ती विश्रांती घेणं गरजेचं आहे. तसच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.