How to Get Rid of Flies in Rainy Season: आजार टाळण्यासाठी घरात स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं असतं. पावसाळा सुरू होताच घरात अनेक प्रकारचे कीटक डास व माश्या दिसू लागतात. कितीही हाकलले तरी माश्या पुन्हा पुन्हा अन्नपदार्थांवर, भाज्यांवर, फळांवर किंवा घरातील भांड्यांवर बसतात. आपण घर कितीही स्वच्छ ठेवले तरी घरात माश्या येतच राहतात. कधीकधी माश्या बाथरूममध्ये फिरतात आणि नंतर थेट स्वयंपाकघरात प्रवेश करतात, त्यामुळे पावसाळ्यात जर माश्या तुमच्या घरात येऊ लागल्या असतील तर तुम्ही त्यांना दूर करू शकता. आपण फरशी पुसताना पाण्यात काही गोष्टी मिसळल्या तर या त्रासातून आपली सुटका होऊ शकते.

चांगलं आरोग्य राखण्यासाठी घरातील स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायला हवं. स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर माशा घोंगावत असल्याने त्या अनेक खाद्यपदार्थांवर जाऊन बसतात व यामुळे आरोग्य विषयक अनेक समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. अशावेळी दररोज घरातली फरशी व्यवस्थित पुसायला हवी. तसंच फरशी पुसण्यामुळे घरात डासही येत नाहीत. मात्र, त्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात काही गोष्टी मिसळाव्या लागतात. घरातले डास कमी करण्यासाठी याची खूप मदत होऊ शकते. केवळ डासच नाही तर माश्या, किडे यामुळे घरात येत नाहीत. पावसाळ्यातील कीटकांना दूर करण्यासाठी काय करता येईल ते जाणून घेऊया…

घरातील फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ, घरातील किडे, माशा होतील दूर

१. पाण्यात व्हिनेगर मिसळा

घरातील फरशी पुसताना तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळा. या पाण्याने घर नीट पुसून टाका. तुम्ही पाण्यात टाकलेल्या व्हिनेगरचा वास घरभर पसरेल आणि कीटक अन् माशाही घरामध्ये येणार नाहीत. व्हिनेगर व पाणी यांच्या मिश्रणामुळे घरात लपलेले डासही निघून जातात.

२. पाण्यात फिनाइलचे काही थेंब टाका

घरातील फरशी पुसताना पाण्यात फिनाइलचे काही थेंब टाका आणि घर नीट पुसून घ्या. फिनाइलच्या वासाने माशा आणि किडे, डास छूमंतर होतील.

३. पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा घाला

घरातील फरशी पुसताना पाण्यात तुम्ही मीठ आणि बेकिंग सोडा घाला व संपूर्ण घर पुसून घ्या, यामुळे पावसाळी किडे तुमच्या घरात येणार नाहीत व तुमची माशा आणि किड्यांपासून सुटका होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि आजूबाजूला पाणी साचू देऊ नका आणि घरातील कचरा दररोज फेकून द्या आणि घरात स्वच्छता राखा, यामुळे पावसाळ्यात घरात डोळ्यांना दिसणार नाहीत माशा आणि डास…