संपूर्ण देश दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे. ४ नोव्हेंबरला दिवाळी आहे. अशा परिस्थितीत २०२१ ची आणखी एक तारीख खूप महत्त्वाची आहे आणि ती लवकरच जवळ येत आहे. २०२१ चे शेवटचे चंद्रग्रहण लवकरच येणार आहे. दिवाळीनंतर, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक प्रकारचं ग्रहण अशुभ मानलं जातं. ग्रहण दरम्यान, सर्व प्राणी आणि मानवांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. चंद्रग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये, असं सांगितलं जातं. २०२१ मध्ये पहिले चंद्रग्रहण २६ मे २०२१ रोजी झाले होते आणि २०२१ मधील शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

राशींवर विशेष प्रभाव पडेल का?

वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण वृषभ आणि कृतिका नक्षत्रात होणार आहे. पण हे आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी होणार नाही. हे ग्रहण काही काळ भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशातच दिसणार आहे.

शेवटचे चंद्रग्रहण कधी होईल?

ज्योतिषीय गणनेनुसार, वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळीनंतर होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, विक्रम संवत २०७८ मध्ये कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला कृतिका नक्षत्र आणि वृषभ राशीमध्ये चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३४ वाजता सुरू होईल आणि ०५.३३ वाजता संपेल.

आणखी वाचा : Lakshmi Pujan 2021 : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी येणाऱ्या पाहूण्यांसाठी झटपट बनवा ‘हे’ खास पदार्थ

चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत

संपूर्ण चंद्रग्रहण
आंशिक चंद्रग्रहण आणि
छाया चंद्रग्रहण

येत्या १९ नोव्हेंबर रोजी छाया चंद्रग्रहण होईल, ज्याला पेनम्ब्रल देखील म्हणतात.

छाया ग्रहण म्हणजे काय?

चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण मानले जाते. छायाग्रहण हे खरे चंद्रग्रहण मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रातही सावलीला ग्रहणाचा दर्जा दिलेला नाही.

आणखी वाचा : Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत या ४ राशींचे भाग्य चमकेल, संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता

कसं असतं ग्रहण ?

चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्र पूर्णपणे किंवा अंशतः झाकलेला असतो आणि सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, त्याला चंद्रग्रहण म्हणतात. शास्त्रानुसार ग्रहण पूर्ण झाल्यावर त्याचा प्रभाव अधिक असतो. जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण असेल तेव्हाच सुतक नियमांचे पालन करणे उचित आहे. पण छायाग्रहण असेल तर सुतक नियम फारसे पाळले जात नाहीत. चंद्रग्रहण नेहमी ‘पौर्णिमे’ला होते.