Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत या ४ राशींचे भाग्य चमकेल, संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता

यंदाच्या वर्षी ४ नोव्हेंबरला दिवाळी सण साजरा होतोय. या दिवशी लोक विशेषतः महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. यंदाच्या दिवाळीत देवी लक्ष्मी आपली कृपा करणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी..?

4-november-2021-rashifal

Diwali 2021 Lucky Zodiac Sign: यंदाच्या वर्षी ४ नोव्हेंबरला दिवाळी सण साजरा होतोय. या दिवशी लोक विशेषतः महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरांची व्यवस्थित साफसफाई करतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढली जाते आणि दिव्यांच्या रोषणाईने घर सजवलं जातं. त्यामुळे धनाची देवी घराकडे आकर्षित होते. पण अशा काही राशीचे लोक आहेत, ज्यांच्यावर यंदाच्या दिवाळीत देवी लक्ष्मी आपली कृपा करणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी..?

मेष : या राशीच्या लोकांमध्ये दिवाळीच्या दिवशी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रभावशाली लोकांशी संबंध येतील. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. मन प्रसन्न राहील. संध्याकाळपर्यंत काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

कर्क : तुम्हाला पैसे कमावण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे होताना दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या अनुकूल राहील. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. एक नवीन प्रकल्प हाती येणार आहे, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल.

आणखी वाचा : Lakshmi Pujan 2021 : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी येणाऱ्या पाहूण्यांसाठी झटपट बनवा ‘हे’ खास पदार्थ

धनु : दिवाळी तुमच्यासाठी खास असणार आहे. प्रियजनांच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन मित्र बनू शकतात. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात तुमचे १००% देऊ शकाल. तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. नशीब तुमच्या सोबत आहे. नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात प्रगती होईल.

मीन: दिवाळीच्या दिवशी तुम्हाला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामासाठी बक्षीस देखील मिळू शकते. प्रवासातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2021 this diwali the luck of these 4 zodiac signs can open there is a strong possibility of increase in wealth prp

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या