सॅमसंगच्या भात्यातील नव्या टॅबचे भारतीय बाजारात आगमन….

‘गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह 2’ लॉन्च, किंमत…

सॅमसंगच्या भात्यातील नव्या टॅबचे भारतीय बाजारपेठेत आगमन झाले आहे. सॅमसंगने आपला गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह 2 टॅबलेट लॉन्च केला आहे. भारतीय बाजारपेठेत या टॅबची किंमत ५० हजार ९९० रूपये आहे. या टॅबला मिलिट्री ग्रेड डिझाईन देण्यात आली आहे.

वायब्रेशन, जमिनीवर पडणे, पाऊस, धुळ, उष्ण तापमान यापासून हा टॅब पूर्णपणे सुरक्षित राहील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच अर्धा तास दीड मीटर पाण्यात राहिला तरीही टॅबला काही होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मार्च महिन्यात हा टॅब सर्वांना उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

काय आहेत फिचर्स –
– हाय टचची सुविधा
– पोगो पिन
– 4450 Mhp ची रिप्लेसेबल बॅटरी
– एस-पेन
– बायोमॅट्रिक ऑन्थेटिकेशन
– सॅमसंग सिक्युरिटी प्लॅटफॉर्म नॉक्स
– एमआयएल-एसटीडी-810 जी
-आईपी 68 सर्टिफिकेट
किंमत ५० हजार ९९० रूपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samsung galaxy tab active 2 with ip68 build knox security integration launched in india