How Did Sara Ali Khan Loss Weight: चित्रपटात नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसणारी सारा अली खान आज तिच्या फिट आणि स्मार्ट लूकसाठी चर्चेत आहे. कमी वयात आणि कमी वेळात प्रसिद्धी मिळवणारी स्टारकिड म्हणजे सारा अली खान. सारानं आपल्या हटके अंदाजानं बॉलीवूडमध्ये स्थान मिळवलं. पण तुम्हाला माहितेय का, कधी काळी तिचं वजन तब्बल ९६ किलो होतं? हो, अगदी खरं! पण एवढं वजन असतानाही सारा आपल्या स्वप्नांपासून डगमगली नाही. अभिनयात करिअर करायचं हे तिनं ठरवलं होतं आणि त्यासाठी तिनं स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. नुकतीच सारा अली खानची नवी फिल्म ‘मेट्रो इन दिनों’ (Metro in Dino) चित्रपटगृहांत झळकली आणि त्याच वेळी तिच्या जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशनचीही चर्चा रंगली आहे.

वजन कमी करण्यामागे होता ‘करिअर’चा मोठा निर्णय

सारानं एका मुलाखतीत सांगितलं की, डायरेक्टर करण जोहर यांनी तिला पहिली फिल्म देण्याआधी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्या क्षणी सारानं ठरवलं की, आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची.

सारा अली खानची शारीरिक स्थिती होती आव्हानात्मक

साराला पीसीओएस (Polycystic Ovary Syndrome) हा हार्मोनल विकार होता. या स्थितीत वजन कमी करणं फार कठीण असतं. कारण- मेटाबॉलिझम आणि हार्मोन बॅलन्सवर त्याचा थेट परिणाम होतो. पण तरीही सारानं तब्बल ४५ किलो वजन कमी करून सगळ्यांनाच थक्क केलं. कोणत्याही व्यक्तीसाठी ४५ किलो वजन कमी करणं हे सोपं काम नाही. यासाठी साराने प्रचंड मेहनत घेतली आहे.

वजन कमी करण्यासाठी सारानं नेमकं काय केलं?

तिनं घेतलेली होलिस्टिक अप्रोच हेच तिच्या यशाचं खरं गुपित ठरलं. या पद्धतीमध्ये तिनं नियमित वर्कआउट, योग्य आहार व तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन यांचा समावेश केला. तिच्या डेली रूटीनमध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा व डान्स यांचा समावेश होता. त्यामुळे तिला वर्कआउट कंटाळवाणं वाटलं नाही; उलट तिचं वजन झपाट्यानं कमी होत गेलं.

वजन कमी करणं फक्त अभिनयासाठी नव्हतं…

साराचं ट्रान्स्फॉर्मेशन केवळ करिअरपुरतं मर्यादित नव्हतं. तिच्यासाठी हा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्याचा एक मार्ग होता. पीसीओएसवर नियंत्रण मिळवणं, आत्मविश्वास वाढवणं आणि आरोग्य टिकवणं हे सगळं तिच्या या प्रवासातून शक्य झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साराचा हा प्रवास आज हजारो तरुणींसाठी प्रेरणा ठरत आहे; विशेषतः त्यांच्यासाठी, ज्या पीसीओएससारख्या त्रासदायक स्थितीशी झुंज देत आहेत.