Should we eat curd in winter: हिवाळा सुरू झाला आहे आणि या हंगामातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व स्वादिष्ट अन्न. ताज्या ताज्या भाज्या आणि गरमागरम पदार्थ हिवाळ्याची मजा द्विगुणित करतात. पण या ऋतूत आपल्या आवडीच्या काही गोष्टीही सोडायला भाग पाडतात. त्यापैकी एक दही आहे. साधारणपणे असे मानले जाते की हिवाळ्यात दही खाणे टाळावे कारण त्यामुळे सर्दी होऊ शकते आणि घसा दुखू शकतो, पण हे खरे आहे का? दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया, जीवनसत्त्वे, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर असते, मग आपण ते खाणे का टाळावे? हिवाळ्यात दही खावे की नाही याबद्दल आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगते? जाणून घ्या..

आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात हिवाळ्यात दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण दह्याचा थंड प्रभाव असतो ज्यामुळे हिवाळ्यात अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हाला आधीच सर्दी झाली असेल तर दह्यापासून दूर राहणे योग्य ठरेल. त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

( हे ही वाचा: Uric Acid: जेव्हा यूरिक अॅसिडची पातळी १० mg/dL पेक्षा जास्त होते, तेव्हा शरीर देऊ लागते ‘या’ प्रकारचे भयंकर संकेत)

आधुनिक मेडिकल साइंस काय म्हणते?

मेडिकल साइंसनूसार, थंडीत दही खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः जर तुम्ही दुपारच्या जेवणात दही खाल्ले तर ते शरीरासाठी फायदेशीर ठरेल. याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वसनाच्या रुग्णांसाठी हानिकारक

मेडिकल साइंस श्वसनाच्या रुग्णांना रात्रीच्या वेळी दह्यापासून दूर राहण्याचा सल्ला देते, कारण रात्री दही खाल्ल्याने कफासंदर्भात समस्या निर्माण होऊ शकते. दम्याच्या रुग्णांसाठी हे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर दही खाणे टाळावे.