Tech tips: चुकून मेल पाठवलात? काळजी नको; ‘या’ स्टेप करा फॉलो आणि मेल होईल पूर्ववत

तुम्ही चुकून मेल पाठवला असेल तर तुम्ही त्याला अंडू करू शकतात. यासाठी फक्त काही स्टेप फॉलो करा.

gmail undo mail
टेक्नॉलॉजी टिप्स (प्रातिनिधिक फोटो)

कधीकधी, आपण सर्वांनी चुकून किंवा घाईने पाठवलेला ईमेल किंवा मजकूर पुनर्प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केलीच असेल. मेसेजिंग अॅप्सने वापरकर्त्यांसाठी ‘प्रत्येकासाठी डिलीट’ या फीचर्ससह हे करणे सोपे केले आहे. परंतु हे ईमेलसाठी करणे कठीण मानले जाते. पण हे करण्यासाठी जिमेलच एक फिचर आहे. जे अनेकांना आजही माहित नाही. तथापि, Gmail वापरकर्त्यांना ३० सेकंदांपर्यंत ईमेल पूर्ववत किंवा पुनर्प्राप्त करण्याची परवानगी देते. हे चुकून पाठवलेले ईमेल लक्षात घेण्यासाठी प्रेषकांना पुरेसा बफर वेळ देते.

Undo Send नावाचे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी डीफॉल्टनुसार उपलब्ध आहे आणि जीमेल वापरकर्ते ५ ते ३० सेकंदांच्या दरम्यान बफर वेळ समायोजित करू शकतात. दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून असे करणे अगदी सोपे आहे.

असा करा ईमेल पूर्ववत

जीमेल उघडा.

सेटिंग्ज वर जा.

जनरल हा ऑपश्न निवडा.

पुढे अंडू सेंट (Undo Send) निवडा, त्यात तुम्हाला ड्रॉपडाउन यादी दिसेल.

तेथून, आपण पाठवलेला मेल पूर्ववत करण्यासाठी ५, १०, २० किंवा ३० सेकंदांतील वेळ निवडू शकता.

डेस्कटॉपवरील जीमेल वापरकर्त्यांना डेस्कटॉपवरील स्क्रीनच्या खालच्या डाव्या बाजूला आणि मोबाईलवर खालच्या उजवीकडे काळ्या बॉक्समध्ये एक अंडू लिंक दिसेल. जर वापरकर्त्यांनी वेळ संपण्यापूर्वी दुव्यावर क्लिक केले तर त्यांचा मेल बाहेर जाणार नाही. वापरकर्ते ईमेल पुन्हा संपादित करू शकतात, किंवा ते पूर्णपणे हटवू शकतात आणि काढून टाकून पूर्ववत करू शकतात आणि पुन्हा सुरवातीपासून ईमेल लिहू शकतात.

जीमेलने जून २०२१ पासून गुगल खात्यांसाठी १५ जीबीची मर्यादा आणली आहे, त्यानंतर गुगल वापरकर्त्यांना स्टोरेजसाठी पैसे द्यावे लागतील. अनावश्यक ईमेल साफ करणे (Clearing out unnecessary ) वापरकर्त्यांना स्टोरेज साफ करण्यास मदत करेल. जीमेल अॅपद्वारे ईमेल हटवणे शक्य आहे.तथापि, जेव्हा आपल्याकडे हजारो मेल असतील आणि आपण एकाच वेळी त्याला डिलीट करू इच्छित असाल, तेव्हा आपल्याला संगणकाची आवश्यकता असेल. गुगल त्याच्या एका सपोर्ट पेजवर नमूद करते की तुम्ही जीमेल अॅप वरून सर्व मेसेज एकत्र हटवू शकत नाही.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tech tips sent mail by mistake dont worry follow these steps and the mail will be undo ttg

ताज्या बातम्या