Skin Care Tips: सध्या पावसाळा जोमात सुरू आहे. पावसाळ्यात अनेक संसर्ग पसरतात. त्यामुळे या ऋतूत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. त्वचेवर पुरळ, खाज, पुरळ, पिंपल्स दिसू लागतात. आपली त्वचा आपल्या शरीराशी जोडलेली असते. जेव्हा जेव्हा अशी कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा ती शरीरातील असंतुलनाचा परिणाम आहे. अशा परिस्थितीत आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तर आज आम्ही तुम्हाला अशी काही आयुर्वेदिक पेये सांगणार आहोत, की ज्याच्या सेवनाने तुम्ही या सगळ्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ पेयांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

मध आणि लिंबूपाणी

ही आयुर्वेदिक पेय बनवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे प्यायल्याने इलेक्ट्रोलाइटचे काम होते आणि शरीरात अँटिऑक्सिडंट्स तयार होतात. हे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकतात. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा मॉइश्चराइज आणि फ्रेश ठेवते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत.

(हे ही वाचा: Hair Care: पावसाळ्यात केसांना दुर्गंधी येतेय?; हे घरगुती उपाय करा, वेळीच सुटका मिळेल.)

ABCC ज्यूस

सफरचंद, बीट, गाजर, काकडी, हे एकत्र करून तयार केलेले ज्युसला ABCC ज्यूस म्हणतात. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात आणि सुरकुत्या आणि पिगमेंटेशनची समस्या दूर करतात. काकडीचा रस तुम्हाला हायड्रेट ठेवतो आणि तुमची त्वचा चमकदार बनवू शकतो.

हर्बल फ्लॉवर टी

कॅमोमाइल चहामध्ये दाहक गुणधर्म असतात जे त्वचा सुधारण्यासाठी चांगले असतात. हे सुरकुत्या कमी करू शकते आणि चेहऱ्यावर येणारे चट्टे देखील कमी करते. तसंच जास्मिन चहा, त्याच्या नैसर्गिक तेलांसह, त्वचेला टवटवीत करण्यास मदत करते, ही चहा त्वचेला टोनिंग करते आणि चेहऱ्यावर दिसणारे वृद्धत्व देखील कमी करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These ayurvedic drinks will be beneficial for enhancing the beauty of the skin find out gps
First published on: 14-07-2022 at 13:04 IST