महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्राच्या रूपाने भारताला नवे राज्य मिळाले. राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात सरकारी सुट्टी असते. हा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे परेड, उत्सव इत्यादींचे आयोजन केले जाते. या सोहळ्यांमध्ये राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मोठे नेते आणि इतर लोक तसेच सामान्य जनताही सहभागी होतो.

यंदाचा महाराष्ट्र दिन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही काही पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. महाराष्ट्रातील बरेच पदार्थ फक्त आपल्या राज्यातच नाहीत तर देशात, त्याचबरोबर जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यातीलच काही प्रसिद्ध पदार्थ जाणून घेऊया.

मिसळ पाव :

मिसळ पाव हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ आहे. मिसळ म्हणजे वेगवेगळे कडधान्य एकत्र करून तयार केलेला तिखट आणि झणझणीत रस्सा. कांदा, लिंबू, भरपूर फरसाण आणि पाव यांच्यासोबत आपण मिसळ पावाचा आस्वाद घेतो.

कोथिंबीर वडी :

कोथिंबीर वडी महाराष्ट्रातील बहुतेक घरांमध्ये आवर्जून बनवली जाते आणि ती अनेकांना आवडतेही. या वड्या अतिशय कुरकुरीत आणि चवीला चटपटीत असतात.

पुरणपोळ्या :

पुरणपोळ्या हे महाराष्ट्राचे पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. अनेक सण-समारंभ, शुभप्रसंगी घराघरात पुरणपोळ्या बनवल्या जातात. चण्याच्या डाळीचे गोड पुरण भरून बनवलेली ही पुरणपोळी सर्वांच्याच आवडीची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अळूवड्या :

अळूच्या पानांमध्ये चटपटीत सारण भरून तयार केलेल्या अळूवड्या कोणाला आवडत नाहीत? खरपूस तळलेल्या या वड्या आणि त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर हे एक वेगळंच समीकरण आहे.