लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. कोणी वजन वाढण्याच्या भीतीने खाणेच सोडून देतात तर काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. असे केल्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. कारण बऱ्याच वेळेला वजन कमी करण्याच्या नादात लोक काही चुका करतात आणि त्यामुळे हवा तसा फरक जाणवत नाही, जेव्हा या चुका त्यांना कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगळी पद्धत जाणून घेऊया.

  • रात्रीचे जेवण करणे टाळा
    जर तुम्हाला खरोखरच लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रात्री काहीही खाऊ नका. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अन्न खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी ७ ते दिवसा ३ असे ठरवा. म्हणजेच हा एक प्रकारचा अधूनमधून उपवास आहे. अशा परिस्थितीत किंवा दुपारी ३ नंतर अन्न खाणे बंद करा. तसेच याशिवाय त्यांना दर आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम करा, असा बर्मिंगहॅममधील अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी एका अभ्यासात दावा केला आहे.
  • गरम पाणी प्या
    शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सर्वात सरळ व साधासोपा मार्ग म्हणजे दिवसभरात गरम पाणी पित राहणे हा आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेलं टॉक्सिक म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तुम्हाला झटपट व जास्त फायदा दिसावा अशी इच्छा असेल तर दररोज अर्ध्या अर्ध्या तासाने गरम पाण्याचे काही घोट पिण्याचा नक्की प्रयत्न करा. या गरम पाण्यात तुम्ही लिंबाचा रस व मधाचे थेंबही टाकू शकता. यामुळे दुप्पट फायदा दिसून येईल.

(आणखी वाचा : Stress and Health: जास्त तणावामुळे होऊ शकतात ‘हे’ ८ गंभीर आजार; ‘या’ पदार्थांचे सेवन करा, नक्कीच फायदा होईल )

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
  • झोपेची विशेष काळजी घ्या
    जर तुम्ही खरंच वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुरेशी झोप. कारण अपुऱ्या झोपेमुळे शरीराला अनेक आजार विळखा घालतात. अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर एकाग्रतेमध्ये बाधा येते व अपचन, गॅस, अॅसिडीटी अशा अनेक समस्या भेडसावू लागतात. यासाठी रात्री १० वाजता झोपणं आणि सकाळी ६ वाजता उठणं अत्यंत गरजेचं असतं. शरीरात उर्जा कायम राहते व कामात उत्साह येतो.
  • तणाव कमी करा
    जर तुम्ही सतत तणावाखाली असाल तर तुमचे वजन कमी होणार नाही. तणावाच्या काळात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन बाहेर पडतो. या हार्मोनचे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम शरीरावर होतो. यामुळे वजन वाढू शकते. ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा देखील आपण दररोज केला पाहिजे. ज्यामुळे आपला ताण कमी होतो आणि वजनही झटपट कमी होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader