भारताच्या अनेक भागांमध्ये केळीच्या हिरव्या पानांचा वापर अन्न शिजवण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी केला जातो. विशेषतः दक्षिण भारतीय किंवा दक्षिण आशियाई पदार्थ केळीच्या पानांवर दिले जातात. ही पारंपरिक पद्धत शतकानुशतके अवलंबली जात आहे. परंतु, केळीच्या पानांचा वापर केल्याने काय फायदे होतात याचा कधी विचार केला आहे का? चला तर मग जाणून घेऊ केळीच्या पानावर जेवण्याचे आठ जबरदस्त फायदे.
केळीच्या पानात जेवण्याचे आठ फायदे
१) पौष्टिक मूल्य
केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जेव्हा केळीच्या पानावर अन्न ठेवले जाते, तेव्हा त्यातील काही पोषक घटक अन्नामध्ये मिसळतात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढते.
२) जेवणाची चव वाढवते
केळीच्या पानांवर खाल्ल्याने जेवणाची चव वाढते. ही पानं अन्नाला सौम्य, मातीची चव देतात, ज्यामुळे अन्नाची चव वाढते.
३) आकर्षक दिसतात
केळीच्या पानावर खाल्ल्याने अन्नाला पारंपरिक आकर्षण प्राप्त होते. जर तुम्ही मनापासून अन्न खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
४) नॉन टॉक्सिक ऑप्शन
प्लास्टिक किंवा थर्माकोल प्लेट्सच्या तुलनेत केळीची पाने विषारी नसतात, ज्यामुळे हानिकारक रसायने अन्नामध्ये मिसळत नाहीत. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
५) पचनक्रिया सुधारते
केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढवतात, जे चांगले पचन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करतात.
६) नैसर्गिक जंतुनाशक
केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने अन्नजन्य रोगांचा धोका कमी होतो.
७) इको फ्रेंडली
डिस्पोजेबल प्लेट्सचा नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर करणे हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. यामुळे प्लास्टिक किंवा फोम प्लेट्सची गरज कमी होते,
८) बायोडिग्रेडेबल
केळीची पाने जैवविघटनशील असतात, म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचवता ती सहजपणे नष्ट होतात. यामुळे जेवण वाढण्यासाठी हा एक शाश्वत पर्याय आहे.