Weight Loss Food: आजकाल अनेक जण वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत. वाईट खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि ऑफिसमध्ये न शऊ तास एकाच जागी सतत बसून राहिल्याने लोकांचे वजन वाढू लागले आहे. एकदा वजन वाढले की, ते कमी करणे अत्यंत कठीण असते. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका तर निर्माण होतोच; पण त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावरही दिसून येतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामासह तुमच्या आहाराकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, आहारात फायबर व निरोगी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही नाश्त्याचे प्रकार सांगणार आहोत, जे खाण्यासही चविष्ट आहेत आणि त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास शदेखील मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सकाळच्या नाश्त्यात चणे आणि स्प्राउट्स चाट खावे. हा एक निरोगी नाश्त्याचा चांगला पर्याय आहे. त्यासाठी त्यात तुम्ही काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, बीट, गाजर यांचाही वापर करा.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात बाजरी, नाचणी, ज्वारी, ओट्स यांचे थालीपीठ बनवू शकता.

नाश्त्यात मूग डाळ चिल्ला सर्वांसाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही लठ्ठपणाला वैतागला असाल, तर तुमच्या सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ समाविष्ट करा. कारण- त्यात प्रथिने जास्त आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वजन कमी करण्यासाठी आणि कार्ब्स कमी करण्यासाठी व्हेजिटेबल उत्तपा हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे करण्यासाठी, उडीद डाळ व तांदूळ मिसळा. हे बनवण्यासाठी तुम्ही रवादेखील वापरू शकता. तुम्ही त्यात तुमच्या आवडत्या भाज्यादेखील घालू शकता. त्यातून तुम्हाला भरपूर फायबर मिळेल.