Does Drinking Water Before Meals Affect Blood Sugar Levels: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्या. पण, या साध्या वाटणाऱ्या सवयीचा खरोखरच फरक पडतो का, विशेषतः मधुमेह किंवा प्री-डायबेटीज असलेल्यांना, असा प्रश्न अनेकांना पडतो.
या प्रकारे पाणी आधी प्यायल्याने फरक पडतो, अशा दावा करणाऱ्या समर्थकांना विश्वास आहे, “जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने पचन होण्यास मदत होते, ग्लुकोजचे शोषण कमी होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.” तर त्याविरुद्ध युक्तिवाद करणारे म्हणतात की, , “पाणी पिणे हे एकूण आरोग्यासाठी आवश्यक असले तरी त्याची वेळ ग्लायसेमिक नियंत्रणावर लक्षणीय परिणाम करू शकत नाही.”
तर, ही पद्धत प्रत्यक्षात काम करते का, की ती फक्त एक मिथक आहे? (So, does this tactic actually work, or is it just another wellness myth?)

मधुमेहाविषयी जागृती करणाऱ्या प्रशिक्षक कनिक्का मल्होत्रा दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने जेवल्यानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी होण्यास मदत होऊ शकते, विशेषतः टाईप २ मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांमध्ये. पाणी पोट भरल्याची भावना वाढवू शकते, ज्यामुळे कमी खाणे आणि पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावू शकते, जे दोन्ही जेवणांनंतर रक्तातील साखरेची वाढ रोखू शकते. त्याव्यतिरिक्त, पुरेशा प्रमाणात शरीरात पाण्याची पातळी राखल्याने मूत्रपिंडाचे कार्यही सुरळीत राहाते. मूत्रमार्गे अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यास मदत करून ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास या पाणी पिण्यामुळे मदत होते.”

मल्होत्रा पुढे सांगतात, “पाणी स्वतः आतड्यांमधील ग्लुकोज चयापचय किंवा शोषणात थेट बदल करत नाही. मुख्य फायदा तृप्तता वाढवणे आणि एकूण चयापचय प्रक्रिया सुरळीत पार पडू देणे हा आहे.”

या सवयीमुळे इतरांपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो अशा काही विशिष्ट गटातील लोक आहेत का? (Are there specific groups of people who might benefit more from this habit than others?)

मल्होत्रा यांच्या मते, टाईप २ मधुमेह, प्री-डायबेटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तींना जेवणापूर्वी पाणी पिण्याचा जास्त फायदा होऊ शकतो. त्यांच्या बाबतीत गुंतागुंत टाळण्यासाठी रक्तातील साखरेच्या वाढीचे व्यवस्थापन करणे विशेषतः महत्त्वाचे आहे. पाणी पिण्यामुळे कॅलरीजचे सेवन कमी होण्यास आणि ग्लुकोजचे शोषण कमी होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे ग्लायसेमिक नियंत्रण सुधारू शकते. त्याव्यतिरिक्त, ज्या लोकांचे वजन जास्त आहे किंवा ज्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, त्यांना अतिरिक्त फायदे जाणवू शकतात. तुम्ही साखरयुक्त पेयाऐवजी साधे पाणी पिऊ शकता, जे वजन व्यवस्थापनास मदत करू शकते. पण, मूत्रपिंड किंवा हृदयाच्या समस्या असलेल्यांनी द्रवपदार्थाचा अतिरेक टाळण्यासाठी पाण्याचे सेवन वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पचन किंवा पोषक घटकांच्या शोषणात काही अडथळा येऊ शकतो का, विशेषतः पोटाचे आजार असलेल्यांसाठी?(Could drinking water right before meals interfere with digestion or nutrient absorption in any way, especially for individuals with gastrointestinal conditions? )

मल्होत्रा स्पष्ट करतात, “बहुतेक तंदुरुस्त व्यक्तींसाठी जेवणापूर्वी किंवा जेवणासह पाणी प्यायल्याने पचन किंवा पोषक घटकांच्या शोषणात अडथळा येत नाही. पोषक घटक विरघळण्यास आणि पचनमार्गातून अन्न पुढे जाण्यास मदत करून, पाणी प्रत्यक्षात पचनास मदत करू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण, गॅस्ट्रोपेरेसिस (पोट रिकामे होण्यास उशीर) किंवा गंभीर अ‍ॅसिड रिफ्लक्ससारख्या काही पोटाचे आजार असलेल्या लोकांमध्ये जेवणापूर्वी जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटाचा आकार आणि दाब वाढून, त्रासाची लक्षणे आणखी बिघडू शकतात. पण, कमी प्रमाणात पाणी पिणे आणि वैयक्तिक बदलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.