दीपिका पादुकोणला सोमवारी रात्री अस्वस्थ वाटत असण्याची तक्रार होती. त्यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. आता तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. यागोदर देखील तिला अस्वस्थ वाटत होते. दीपिकाला हदयगती वाढण्याची समस्या आहे. वैद्यकीय भाषेत यास हार्ट एरिदिमिया असे म्हटले जाते. काय आहे आजार? आणि ती होण्याची कारणे काय आहेत? याबाबत जाणून घेऊया.

काय आहे हार्ट एरिदिमिया?

हा आजार हृदयाशी संबंधित आहे. यात हृदयाचे ठोके अचानक वाढू लागतात किंवा कमी होता. हृदयात इलेक्ट्रिकल इम्पल्स काही ठरलेल्या मार्गातून जातात. याने शरिरात रक्ताभिसरण चागल्याने होते. मात्र जेव्हा इलेक्ट्रिक इम्पल्स चांगल्याने काम करत नाही तेव्हा एरिदिमियाची समस्या होऊ शकते.

हार्ट एरिदिमिया होण्याची कारणे

  • उच्च रक्तदाबाची समस्या
  • संसर्ग किंवा ताप
  • काही औषधींचे सेवन करणे
  • नैराश्य
  • तणाव
  • मद्य कॅफीन किंवा तंबाखूचे सेवन

वरील कारणांमुळे हार्ट एरिदिमिया हा आजार होऊ शकतो. तसेच काही लोक आवश्यक्तेपेक्षा अधिक व्यायाम करतात, त्यांना देखील हा आजार होऊ शकतो. हृदयाशी संबंधित जुन्या आजाराने देखील ही समस्या उद्भवू शकते.