Aluminium Cooker or Steel Cooker : कुकर हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. कुकरमध्ये आपण सहसा वरण, भात किंवा कधीकधी भाजीसुद्धा बनवतो. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की काही कुकर लवकर खराब होतात. असं का होते? जेवण बनवण्यासाठी कोणता कुकर चांगला आहे? अ‍ॅल्यूमिनियम की स्टीलचा कुकर वापरावा? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असेल तर टेन्शन घेऊ नका कारण आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या.
सुरुवातीला आपण अ‍ॅल्यूमिनियम आणि स्टील कुकरचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ या.

अ‍ॅल्यूमिनियम कुकर

फायदे

अ‍ॅल्यूमिनियम कुकर खूप हलका असतो पण वापरण्यासाठी हा कुकर खूप सोयीस्कर असतो. अ‍ॅल्यूमिनियम धातू लवकर गरम होतो त्यामुळे या कुकरमध्ये लवकर अन्न शिजते. याशिवाय अ‍ॅल्यूमिनियम धातू स्वस्त असल्यामुळे कुकरसुद्धा तितका महाग नसतो.

तोटे

अ‍ॅल्यूमिनियम कुकर खूप लवकर चकम गमावून बसतो. त्यामुळे हा कुकर कमी कालावधीत जूना दिसायला लागतो. आरोग्यासाठी अ‍ॅल्यूमिनियम कुकर तितका चांगला नाही. त्यामुळे अनेकजण अ‍ॅल्यूमिनियम कुकर वापरण्याचे टाळतात.

हेही वाचा : पालकांनो, या गोष्टी लक्षात ठेवा; मग मुले तुमच्याशी कधीही बोलणार नाहीत खोटे

स्टील कुकर

फायदे

स्टील कुकर वापरणे खुप सोयीस्कर आहे. या कुकरची चमक जास्त काळ टिकून राहते. स्टील कुकरमध्ये जेवण बनविणे, आरोग्यासाठी चांगले असते.

तोटे

स्टील कुकर अ‍ॅल्यूमिनियम कुकरच्या तुलनेत खूप वजनदार असतो. स्टीलला गरम होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे अन्न लवकर शिजत नाही ज्यामुळे स्टील कुकरमध्ये जेवण बनवताना जास्त गॅस खर्च होतो. अ‍ॅल्यूमिनियम कुकरच्या तुलनेत स्टील कुकर महागडे असतात.

जेवण बनवण्यासाठी कोणता कुकर चांगला आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही अ‍ॅल्यूमिनियम कुकर खरेदी करू शकता. कमी वेळेत तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर स्टील कुकर चांगला पर्याय आहे. स्टील कुकर महागडा असेल तरी ही एक चांगली गुंतवणूक आहे. स्टील कुकरमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले असते.