जायचं, पण कुठं? : सोमनाथ

गुजराच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे.

somnath temple
सोमनाथ मंदिराचे संग्रहित छायाचित्र

गुजराच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिìलगांपकी सोमनाथ अग्रस्थानी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेस दक्षिणेकडील अन्टाकर्ि्टकापर्यंत जमिनीचा एकही तुकडा नाही. अथांग अरबी समुद्राच्या पाश्र्वभूमीवरील प्रशस्त सोमनाथचे मंदिर फारच आकर्षक दिसते. संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान इथे साऊंड आणि लाइटचा शो असतो. कन्याकुमारीप्रमाणेच इथला सूर्यास्तदेखील पर्यटक आवर्जून पाहण्यासाठी येतात. संध्याकाळच्या आरतीनंतरचा लाइट आणि साऊंड शो तासभर चालतो जो आपणास मंदिराची ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजावून सांगतो. दिवसातून तीन वेळा दीपआराधना-आरती असते. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार पटेलांच्या प्रयत्नाने सोमनाथ मंदिराचे पुनíनर्माण झाले. गझनीच्या मेहमूदने आणि इतर परकीयांनी अनेक वेळा अक्षरश: लुटून विध्वंस कलेले हे मंदिर तितक्याच ताकदीने पुन्हा उभे राहिले आहे. जवळच त्रिवेणी घाट आहे, जिथे हिरण्या, कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. जवळच पाच पांडव गुंफा आहे. अज्ञातवासात पांडवांचे या छोटय़ा गुहेत काही काळ वास्तव्य होते असा समज आहे. जवळच मूळचे प्राचीन सोमनाथ मंदिर तसेच द्वारकाधीश मंदिरही इथे आहे. गीरचे अभयारण्य जवळच असल्याने दोन दिवस आरामात गीरच्या जंगलात घालवता येतात. गीरच्या जंगलात आशियाई सिंह त्यांच्या नसíगक मोकळ्या वातावरणात पाहता येतात. तिथे जाण्यासाठी प्रवेश पास आधीच इंटरनेटवरून घेणे सोयीचे ठरते, अन्यथा अनेकदा खूपदा लांब रांगेत उभे राहावे लागते. येथील गिरनार पर्वत अनेकांना आकर्षति करत असतो. सोमनाथ-गीर चार-पाच दिवसांत पाहता येते.

उत्तम कालावधी – ऑक्टोबर ते मार्च

जवळचे विमानतळ – केशोड

जवळचे रेल्वे स्थानक – वेरावळ

खास सोमनाथ एक्स्प्रेस अहमदाबाद ते वेरावळ जाते. वेरावळ अनेक रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे. जुनागढ, भावनगर, पोरबंदर, मुंबई तसेच अनेक शहरांतून बस सेवा उपलब्ध.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Somnath temple in saurashtra gujrat

ताज्या बातम्या