सोनल चितळे – 

मेष गुरू-रवीच्या षडाष्टक योगामुळे मानापमानाचे प्रसंग ओढवतील.  नोकरी-व्यवसायात आपली बाजू खंबीरपणे मांडाल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. त्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कामामध्ये नव्या अडचणी येतील. आíथक घडी नीट बसवण्यासाठी जोडीदाराचा मोठा हातभार लागेल. त्याच्या कार्यक्षेत्रातील कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करणे महत्त्वाचे! श्वसनाचे विकार संभवतात. त्वचा कोरडी पडेल.

वृषभ चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे आपली कर्तव्ये आणि आवडीनिवडी यांना योग्य न्याय द्याल. नोकरी-व्यवसायात मेहनतीने व धडाडीने आपल्या कार्यात आगेकूच कराल. वरिष्ठांचे मत मान्य करून इतरांच्या हिताचा विचार कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघे मिळून यशस्वीपणे निभावून न्याल. घरातील ज्येष्ठ मंडळींची विशेष काळजी घ्याल. घशाला सूज येऊन दुखण्याची शक्यता आहे!

मिथुन बौद्धिक राशीतील चंद्र-नेपच्यूनच्या युती योगामुळे व्यावहारिक गोष्टी काटेकोरपणे बघाल. इतरांच्या भावनांची कदर कराल. नोकरी-व्यवसायातील संधीचा योग्य लाभ घ्या. वरिष्ठांची मते पटणे कठीण! तरी आपले म्हणणे नरमाईने मांडा. सहकारी वर्गाचे अपेक्षित साहाय्य मिळणार नाही. त्यांच्या अडचणींचा वेगळा विचार कराल. जोडीदाराचा लहानसहान गोष्टींवरून पारा चढेल. त्याला प्रेमाने जिंकाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. उत्सर्जनाच्या तक्रारी वाढतील.

कर्क गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. कामे लगेच पूर्ण होतील अशी अपेक्षा करू नका. नोकरी-व्यवसायात नव्या अडचणीतून मार्ग शोधाल. सहकारी वर्गाच्या मदतीने गाडी रुळावर येईल. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. आहारातील पथ्य व हलका व्यायाम उपयोगी ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंब सदस्यांची या परिस्थितीत चांगली साथ मिळेल. उष्णतेचे विकार आणि अपचन यांचा त्रास बळावेल.

सिंह चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे चंचल चंद्राला मंगळाच्या धडाडीची जोड मिळेल. नव्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे बळ मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या बाजूने उभे राहतील. सहकारी वर्गाकडून उल्लेखनीय साहाय्य मिळेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. कुटुंब सदस्यांच्या भावनिक गरजा पूर्ण कराल. गुडघे, हाडे व हाताच्या बोटांचे सांधे आखडतील. ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता भासेल.

कन्या शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे संयमी शनीचा चंद्राच्या चंचलतेवर आळा बसेल. आपल्या कार्यशक्तीचा योग्य वापर कराल. नोकरी-व्यवसायात बुद्धिचातुर्याचा उपयोग करून अनेक कामे हातावेगळी कराल. कायद्याच्या मर्यादेत राहून आपले काम साध्य होईल. सहकारी वर्गाचा पािठबा मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. कुटुंबातील ताण कमी कराल. छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

तूळ बुध-चंद्राच्या नवपंचम योगामुळे वैचारिक पातळी उंचावेल. व्यवहारज्ञानाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताचा आदर कराल. अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराल. निरपेक्ष वृत्तीने समाजकार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात काही अडथळे येतील. त्याला आíथक समस्येला सामोरे जावे लागेल. कुटुंबाचे व्यवस्थापन सांभाळताना नवी आव्हाने पेलावी लागतील. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक मंगळ-नेपच्यूनच्या युती योगामुळे कौटुंबिक सुखासाठी भावनांवर ताबा मिळवाल. नोकरी-व्यवसायात धडाडीने पुढे जाल. काही निर्णायक क्षणी खंबीरपणे उभे राहाल. वरिष्ठ व सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. कुटुंब व कार्यक्षेत्र यांच्यात समतोल राखाल. घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवाल. ज्येष्ठांची विशेष काळजी घ्याल. रागावर नियंत्रण ठेवाल. परिस्थितीचा स्वीकार कराल. अपचनामुळे पोट दुखेल तसेच उत्सर्जनाच्या तक्रारी वाढतील.

धनू रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. मेहनतीचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात कळीचा मुद्दा योग्य वेळी पुढे मांडाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. समयसूचकता वापरून तो अनेक गोष्टींना एकाच वेळी योग्य न्याय देईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घ्याल. नवे प्रश्न शिताफीने सोडवाल. मूत्रविकार दुर्लक्षित करू नका. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. तसेच पथ्य पाळणे आवश्यक!

मकर गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. ओळखीच्या व्यक्तींकडून स्वाभिमान न दुखावता  मदतीचा स्वीकार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पारडे जड होईल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित कामे करून घ्याल. त्यांचे साहाय्य लाभेल. जोडीदाराच्या कामात त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी न घडल्याने थोडी उदासीनता येईल. त्याला प्रोत्साहन देणे व उत्साहित करणे आपले कर्तव्य आहे. डोकेदुखी व मणक्याचे त्रास सतावतील.

कुंभ चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे संशोधन क्षेत्रात आपले मोठे योगदान असेल. डेटा अ‍ॅनालिसिस, वैद्यकीय क्षेत्र यातील कामे वेग घेतील. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदाराच्या स्पष्टवक्तेपणामुळे काही कामे झटपट पुढे सरकतील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. नातेवाईकांना आधार द्याल. आपला शाब्दिक धीरसुद्धा त्यांना मोठा वाटेल. वैचरिक ताणतणावामुळे पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मीन चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे कला, साहित्य, छंद यांमध्ये वेळ सत्कारणी लावाल. नव्या संकल्पना विकसित कराल. नोकरी-व्यवसायातील अडीअडचणींवर दृढनिश्चयाने मात कराल. अनिश्चिततेपुढे हार मानू नका. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण थोडे त्रस्त असेल. संयम राखा. घसा सुजणे, खांदे दुखणे संभवते. योग्य खबरदारी घ्यावी.