12 August 2020

News Flash

भाजप सत्तेवर आल्यास मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर होईल- शहा

मुस्लीम बांधवांच्या मनात भाजपच्या विरोधकांनी चुकीचा समज पसरविला आहे; मात्र भाजप सत्तेवर आल्यास त्या समाजातील जनतेच्या मनातील हा समज निश्चितच दूर होईल.

| May 6, 2014 01:32 am

भाजप अध्यक्ष अमित शहा

मुस्लीम बांधवांच्या मनात भाजपच्या विरोधकांनी चुकीचा समज पसरविला आहे; मात्र भाजप सत्तेवर आल्यास त्या समाजातील जनतेच्या मनातील हा समज निश्चितच दूर होईल. घटनेतील निकषांना अनुसरूनच आमचे सरकार कारभार करील, असे  नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. गुजरातमधील पाळत प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नियुक्त करण्याची घोषणा करून काँग्रेसचे सरकार सुडाचे राजकारण करीत आहे. मोदी आणि भाजपने जे चित्र रंगविले आहे ते एकच आहे. सरकार घटनेनुसारच कारभार करणार असल्याचे शहा म्हणाले. मोदींचे सरकार असो की वाजपेयी यांचे, देशाचा कारभार घटनेला अनुसरूनच व्हावयास हवा, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2014 1:32 am

Web Title: modi as pm will remove muslims misunderstanding amit shah
Next Stories
1 महिला पाळतप्रकरणी न्यायाधीश नियुक्तीचा निर्णय पुढील सरकारवर
2 मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी
3 निवडणूक आयोगाला मोदींचे आव्हान
Just Now!
X