मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी माझ्यावर टीका करण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा राज्यातील शेतकऱयांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत असे प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी दिले. ते नंदुरबार मधील जाहीर सभेत बोलत होते.
महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा प्रगत राज्य आहे. असे म्हणत गुजरात विकास मॉडेलला जाहीर चर्चेचे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. यावर मोदी म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा राज्यातील शेतकऱयांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत आणि आज महाराष्ट्रातील शेतकऱयांना रोजगारासाठी गुजरातमध्ये का यावे लागते? याचे उत्तर द्यावे. जळगावातील कापूस विकण्यासाठी शेतकऱयांना गुजरात गाठावे लागते. जळगावातील कापूस जळगावातच का विकला गेला नाही? ” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. गुजरातचा विकास होतो, पण गुजरातपासून जवळच असणाऱया नंदुरबार, धुळ्याचा विकास का होत नाही? असेही मोदी म्हणाले.
बेजबाबदारपणे वादग्रस्त वक्तव्ये करणाऱयांवर मोदी नाराज