अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या अर्जाविषयी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवल्याने नवनीत राणा यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवनीत कौर-राणा यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेविषयी मुंबईत जातपडताळणी समितीकडे असलेले प्रलंबित प्रकरण, याच विषयावर न्यायप्रविष्ट प्रकरण आणि आता नवनीत राणा यांचे नाव मतदार यादीत नसल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खासदार आनंदराव अडसूळ, अपक्ष उमेदवार पंकज मेश्राम, राजू मानकर, तसेच अॅड. चंद्रशेखर डोरले यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतले होते. नवनीत राणा यांचे मतदार यादीत नाव नसून जातप्रमाणपत्राविषयीही त्यांनी चुकीची माहिती सादर केल्याचा दावा त्यांनी केला होता.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेचा मुद्दा निकाली काढला. मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून शहानिशा करून घेतल्यानंतर नवनीत राणा यांचे नाव मतदार यादीत ११६७ क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले असून उपविभागीय अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जातप्रमाणपत्र अर्जासोबत जोडले गेले असल्याने त्यांचा अर्ज स्वीकृत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जातपडताळणी समितीचा निर्णय प्रलंबित असला तरी त्याचा प्रभाव निवडणूक अर्जावर जाणवणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या विरोधाला डावलून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आल्याने खोडके यांनी उघड संघर्षांची भूमिका घेतली. नुकत्याच झालेल्या अजित पवार यांच्या सभेवरही खोडके गटाचा बहिष्कार होता.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2014 रोजी प्रकाशित
अडसूळांचा आक्षेप फेटाळला
अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या अर्जाविषयी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवल्याने नवनीत राणा यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
First published on: 25-03-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anandrao adsul objection rejected