मुंबईत हक्काची जागा असूनही काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे अडचणीत आलेल्या उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रिया दत्त सोमवारी पदयात्रेतील ढिसाळपणामुळे प्रचंड वैतागल्या आणि अखेरीस थेट रिक्षा पकडून ताडकन निघून गेल्या. राज्यातील काँग्रेसला हमखास यश मिळण्याची खात्री असलेल्या उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांच्या प्रचारात काँग्रेस नेत्यांनी अडथळे उभे केल्याने चांगलाच वाद झाला आणि त्याची खमंग चर्चाही झाली. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सोमवार सकाळपासून मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात प्रिया दत्त यांच्या पदयात्रा आखण्यात आल्या होत्या.
दुपारी पावणेबाराच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील खेरनगर-बेहरामपाडा भागात नियोजनाअभावी पदयात्रा दिशाहीन झाली. त्याच गल्ल्यांमध्ये पुन्हा फेऱ्या होऊ लागल्याने प्रिया दत्त वैतागल्या. स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे नेमके कुठे जायचे आहे याची कसलीही माहिती नसल्याचे पाहून प्रिया दत्त वैतागल्या. गोंधळ संपत नाही हे पाहताच कोणालाही न सांगता त्यांनी सुरक्षा रक्षक व सहायकासह थेट रिक्षा पकडून तिथून निघून गेल्या.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
.. आणि वैतागलेल्या प्रिया दत्त रिक्षातून निघून गेल्या
मुंबईत हक्काची जागा असूनही काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे अडचणीत आलेल्या उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रिया दत्त सोमवारी पदयात्रेतील ढिसाळपणामुळे प्रचंड वैतागल्या आणि अखेरीस थेट रिक्षा पकडून ताडकन निघून गेल्या.
First published on: 22-04-2014 at 03:03 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anger priya dutt left home by rickshaw