बिहार राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची दोन मते फुटल्याच्या प्रकाराची पक्षाने गंभीर दखल घेतली असून, या फुटीर आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून अहवाल मागविला आहे.
बंडखोरांचा आक्रमक पवित्रा
पोटनिवडणुकीत जनता दलाच्या उमेदवारांचा पराभव करण्यात अपयश आले असले तरी जद(यू)च्या बंडखोरांनी, सरकारच्या कारभारावर विधानसभेत आवाज उठविण्याचे ठरवत, बंडाचे निशाण कायम ठेवले आहे. जद(यू)च्या १९ बंडखोरांनी ग्यानेंद्रसिंग ग्यानू यांच्या निवासस्थानी बैठक घेतली.