12 August 2020

News Flash

अमिताभ बच्चन, अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्यालाही करोनाची लागण

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींनाही करोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता त्याच्या पाठोपाठ  ऐश्वर्या आणि आराध्यालादेखील करोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. तसंच जया बच्चन यांचे रिपोर्ट्स मात्र निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

सध्या अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. बिग बींच्या जलसा आणि जनक बंगल्यातील कर्मचाऱ्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तसंच गेल्या दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलं आहे.

“ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांची लेक आराध्या अभिषेक बच्चन या दोघींचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसंच जया बच्चन यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. बच्चन कुटुंबातील सदस्य लवकरच बरे होवोत, ही सदिच्छा”, असं ट्विट राजेश टोपे यांनी केलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्यालादेखील करोनाची लागण झाल्यामुळे सध्या बच्चन कुटुंबात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तसंच काही वेळापूर्वी अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील अन्य तीन सदस्यांनादेखील करोना झाल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 3:09 pm

Web Title: aishwarya rai bacchan daughter aaradhya abhishek bacchan have also been detected positive for covid19 ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘नया है वह’, म्हणत फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
2 आपण क्वारंटाइन झाल्याचं वृत्त खोटं, राज्यपाल कोश्यारी यांनी दिली माहिती
3 ऑनलाइन शिक्षणाऐवजी, शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षण
Just Now!
X