News Flash

नंदूरबारमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदारांना जमावाकडून मारहाण

आश्रमशाळेतील मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.

नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच म़त्यू झाला तर उर्वरित मुले जखमी आहेत.

आश्रमशाळेतील पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांवर हल्ला केला. ही घटना नंदूरबार येथे घडली. विनय गौडा असे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. नंदूरबारमध्ये सनदी अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेत सचिन चंद्रसिंग मोरे हा पाचवीत शिकत होता. विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याचा जाब विचारण्यासाठी संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे  अचानक जमावाने सहाय्यक जिल्हाधिकारी गौडा आणि तहसिलदारांवर हल्ला करत मारहाण केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दोन्ही अधिकाऱ्यांवर सरकारी रूग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:50 pm

Web Title: angry mob beaten assistant district collector and tahsildar in nadurbar district
Next Stories
1 वाजपेयींचे निधन नक्की कधी झाले?, संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
2 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
3 भाजपात बुजुर्ग नेत्यांना नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्व: शिवसेना
Just Now!
X