भाजपाच्या स्थापनेपासूनच त्यांना हे वाटत आले आहे की, या देशात अमर, अकबर, अँथनी कधीही गुण्यागोविंद्याने आणि एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीही बंच ऑफ थॉट्स मध्ये हीच शिकवण दिली आहे. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. बाकी महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी असं काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातले ट्विट करुन सत्यजीत तांबे यांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा- उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी अयोध्येत जाणार का? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
दानवे साहेब ,
भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत.द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हिच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे.
बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी ! https://t.co/iVWHpqiB84
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 21, 2020
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे अयोध्येला जातील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. निमंत्रण आले नसले तरीही रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोद्ध्येला जाणार का? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर पहले मंदिर फिर सरकार असं म्हणणारे ठाकरे आथा पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं. याच टीकेला आथा सत्यजीत तांबे यांनी उत्तर दिलं आहे.