कोपरखैरणे येथे एकटे पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरन ताजे असताना अजून दोन आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. या तिन्ही आत्महत्येला करोना विषाणू अटकाव करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची किनार आहे.

मंगळवारी एका इंजिनियरने एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे दोन आत्महत्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात शिवकुमार गुप्ता या रिक्षा चालकाने घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रिक्षा परवाने खुले झाल्यावर त्याने नवी कोरी रिक्षा घेतली होती मात्र करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रिक्षा व्यवसाय पूर्ण पणे ठप्प झाला होता सुमारे दीड महिना काहीही उत्पन्न नाही त्यातच आता कधी धंदा पूर्ववत होईल याची शाश्वती नाही मात्र रिक्षाचे हप्ते देणे भाग आहे खिशात पैसा नाही अशा कात्रीत गुप्ता अडकले होते. या नैराश्यात त्यांनी बुधवारी अपरात्री राहत्या घरात आत्महत्या केली. ही बाब दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यावर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत कोपरखैरणे सेक्टर २ येथेच एका पन्नास वर्षीय व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरील घराच्या स्वयंपाक घराच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. सदर व्यक्तीला दारूचे व्यसन होते मात्र टाळेबंदी असल्याने दारू मिळत नसल्याने त्यांना नैराश्य आले होते असा प्राथमिक अंदाजा व्यक्त करण्यात येत आहे. तरीही या व्यक्तीच्या आत्महत्ये मागे अन्य कारण असू शकते त्याचा शोध आम्ही घेत आहोत अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.

या तीनही आत्महत्येतत एकाने एकटेपणाने नैराश्य येणे दुसऱ्याने कर्जाने नैराश्य येणे आणि तिसऱ्याने मद्य मिळत नसल्याने नैराश्य आल्याने आत्महत्या केली आहे. कारणे वेगवेगळी असली तरी सर्वच आत्महत्येत करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीत आलेले नैराश्य हे मुख्य कारण होते. मात्र टाळेबंदी अनिवार्य असल्याने त्यामुळे टाळेबंदी मुळे येणारे नैराश्य दूर करणे हि सुद्धा मित्र नातेवाईक स्वतः नैराश्य पिडीत व्यक्ती आणि सरकार अशी सामुहिक जवाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहेत.