राज्यात अनेक ठिकाणी दवाखाने बंद असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने अनेक डॉक्टरांना आपल्यालाही त्याची लागण होईल अशी भीती वाटत आहे. काही ठिकाणी कुटुंबीय भीतीच्या छायेखाली जगत असून डॉक्टरांना घराबाहेर जाऊ नका अशी विनंती करत आहे. यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याचं चित्र आहे.

वसईत, ऐरोली, मुंबईसह कोल्हापूरसारख्या ठिकाणीही ही समस्या जाणवत आहे. अनेक खेडेगावांमध्ये चार डॉक्टर असतील तर कसाबसा एक जण वैद्यकीय सुविधा देत आहे. इतरांनी मात्र काम थांबवलं आहे. कोल्हापुरात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली तर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तरीही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक डॉक्टरनी (जनरल प्रॅक्टिशनर्स) वैद्यकीय सेवा देणं थांबवलं आहे.

महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने ओपीडीत गर्दी होऊ नये यासाठी फोन किंवा ऑनलाइन पद्धतीने लोकांशी संवाद साधण्यास परवानगी दिलेली आहे. वसईत शहरातील सर्व खासगी दवाखाने आणि मेडिकल नियमित वेळेत सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी तथा वसई विरार महापालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी १ रुग्ण, महाराष्ट्रात १२४ करोनाग्रस्त

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत एक आणि ठाणे येथे एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

णखी वाचा- Coronavirus : पुढील तीन आठवड्यात हे सर्व संपेलचं असं नाही : छगन भुजबळ

राज्यात बुधवारी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे दाम्पत्य करोनाची लागण झालेलं पहिलं दाम्पत्य होतं. त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.