रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वेस्थानकात नवीन ‘लुप लाईन’ टाकण्यासाठी शक्रवार (२७ डिसेंबर) मध्यरात्री पावणेबारा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेआठ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे निवसर ते विलवडे स्थानकांदरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार असून, दहा गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या मार्गावरील बहुतेक गाडय़ांची वाहतूक दिवसा होते. रात्रीच्या वेळी कमी गाडय़ा धावतात. त्यात रत्नागिरी ते राजापूर दरम्यान रात्रीच्या वेळी धावणाऱ्या गाडय़ांची संख्या कमी आहे. त्यामुळे आडवली येथील काम रात्रीच्यावेळी करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नवीन वर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल होतात. त्याचदरम्यान आडवलीत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणूून रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2019 रोजी प्रकाशित
कोकण रेल्वेमार्गावर आज मेगा ब्लॉक
आडवली येथील काम रात्रीच्यावेळी करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 27-12-2019 at 00:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block today on konkan railway zws