News Flash

“उद्धव ठाकरेजी, खुदा होऊ नका, लोक उपासमारीनं मरतील”; आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुख्यमंत्र्यांना दिला अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील अहवालांचा हवाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील करोना परिस्थिती अजूनही चिंताजनक अशी आहे. मुंबईसह राज्यातील काही शहरात आढळून येणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारची भूमिका मांडली होती. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. टीव्ही ९ ने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील लॉकडाउन अजूनही पूर्णपणे शिथिल करण्यात आलेला नाही. काही शहरात करोना प्रसार अजूनही थांबलेला नसल्यानं लॉकडाउन लागू केलेला आहे. त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही नकारात्मक भूमिका मांडली आहे. मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन न वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

“उद्धव ठाकरे, यांना विनंती… खुदा होऊ नका. करोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मी सुद्धा त्यावेळी घाबरलो होतो. ४० टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीनं म्हटलं होतं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं की भारतात करोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. ऑस्ट्रेलिया जिंकत आहे, असं दिसतंय” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.

“कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडावर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका” असा सल्ला आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 2:05 pm

Web Title: prakash ambedkar demand to dont extend lockdown in maharashtra bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गडचिरोलीत जिल्हाभरातील नागरिकांचा नक्षल सप्ताहास विरोध
2 रायगडला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; अलिबागजवळ ३४ एकर जागा उपलब्‍ध
3 राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; उद्धव ठाकरे दिलं उत्तर…
Just Now!
X