21 September 2020

News Flash

सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही – राऊतांचा टोला

संजय राऊत यांची प्रकट मुलाखत

(PTI)

भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी कन्नडिगांना टोला लगावला. यावेळी सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही. याठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, केवळ थोडा भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे. कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

व्याखानमालेसाठी जमताय ही आनंदाची बाब आहे. नाथ पै काय बोलतात हे ऐकायला नेहरूजीही थांबायचे. बेळगावशी बॅ. नाथ पै यांचं जिव्हाळ्याचं नात होतं. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आहे. बेळगावमध्येच नाही तर महाराष्ट्रातही मराठीसाठी लढावं लागतेय, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

भाषे भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचं काम आम्ही करतोय. ज्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे, तेथील कन्नड शाळा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील शाळांना अनुदान किंवा हवी ती मदत केली जातेय. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठिकाणी कन्नड शाळांना अनुदान दिलं आहे. कन्नड साहित्यकांचं मराठी भाषेमध्ये मोठं योगदान आहे.

काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी आहेत. ते मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात खर्गे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर शुद्ध मराठीतच बोलतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या दौऱ्यामुळे बेळगावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. कर्नाटक पोलिसांनी कार्यक्रम स्थळी चोख बंदोबस्त केला आहे. बेळगावातील गोगटे रंगमिंदारामध्ये संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला.

बेळगाव येथील व्याखानासाठी शनिवारी खासदार संजय राऊत यांचे शनिवारी दुपारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेने विमानतळ परिसर दणाणून सोडला. खासदार राऊत यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

राऊतांच्या मुक्काम ठिकाणात बदल
संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यावरून बेळगाव सीमाभागात प्रचंड उत्सुकता दाटलेली आहे. त्याच वेळी राऊत यांचे बेळगावातील आजचे मुक्कामाचे हॉटेल बदलण्याबाबत पोलिस प्रशासनाने आयोजकांना सांगितले. यापूर्वी राऊत यांच्या मुक्कामासाठी बेळगाव शहरातील क्लब रोड येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. मात्र आता पोलिसांच्या सुचनेनुसार त्यांचा आजचा बेळगावातील मुक्काम शहरापासून काही अंतरावर असलेल्या काकती गावाजवळील मेरेओट हॉटेलात आहे.

कनसेची बकबक
बेळगाव येथे काल कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची गळचेपी केली होती. आज खासदार राऊत बेळगावात येणार असल्याने कर्नाटक नवनिर्माण सेनेचा नेता भीमाशंकर पाटील याने आपली बकबक सुरु ठेवली. मराठी भाषिकांना कर्नाटकातून महाराष्ट्रात हाकलून देऊ, अशी भाषा वापरली. मात्र त्याच्या बडबडीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची भावना बेळगावकरांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 7:08 pm

Web Title: shivsena mp sanjay raut taking about belgan border issue nck 90
Next Stories
1 काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर आम्ही शुद्ध मराठीत बोलतो – संजय राऊत
2 संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह खासदार संजय राऊत यांचे बेळगावात स्वागत
3 इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचा निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा – प्रकाश आंबेडकर
Just Now!
X