News Flash

नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी १ रुग्ण, महाराष्ट्रात १२४ करोनाग्रस्त

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत कुणीही आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवा या सगळ्या संचारबंदी आणि लॉकडाउनमधून वगळण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात कालच दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे दाम्पत्य करोनाची लागण झालेलं पहिलं दाम्पत्य होतं. त्यांना पुण्यातील नायडू  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:33 pm

Web Title: the current count of covid19 patients in the state of maharashtra is 124 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : उपमुख्यमंत्री
2 जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे नियोजन करा; उपमुख्यमंत्र्यांची स्थानिक स्वराज संस्थांना सूचना
3 Coronavirus: दुधाच्या टँकरमधून प्रवास करणे गंभीर, बाजारातील गर्दीमुळे करोनाचा धोका; अजित पवारांनी मांडले दहा महत्वाचे मुद्दे
Just Now!
X