07 March 2021

News Flash

“आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही, त्यामुळे औरंगाबादचं नाव बदललंच पाहिजे”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून  संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर तिथला संघटनात्मक आढावाही घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

शेतकरी कर्जमाफीवरुनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले की, “नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकस आघाडी सरकारची स्थिती आहे. कर्जमाफीच्या नुसत्या घोषणा असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही. सरकारने ३५ लाख जणांची कार्जमाफी करण्याची घोषणा केली, आणि केवळ १५ हजार जणांचीच यादी जाहीर केली. या गतीने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कधी? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विचारला

ते पुढे म्हणाले की, कर्जमाफीसाठी सरकार जर आचारसंहितेचं कारण देत असेल, तर कर्जमाफीसह, थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय ही थांबवावा लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 5:09 pm

Web Title: the name of aurangabad must be changed demands chandrakant patil scj 81
Next Stories
1 राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे निधन
2 गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
3 ‘… पण त्यांची नियत साफ दिसत नाही,’ मनसे आमदाराची शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका
Just Now!
X