News Flash

राज्यातील काही दिवसांची सत्ता उपभोगा

विधानसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला घरी घालविणार आहे, त्यामुळे मिळणाऱ्या दिवसांची सत्ता उपभोगा, असा उपरोधिक सल्ला हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत दिला.

| May 19, 2014 03:07 am

विधानसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला घरी घालविणार आहे, त्यामुळे मिळणाऱ्या दिवसांची सत्ता उपभोगा, असा उपरोधिक सल्ला हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत दिला. मला ‘सिझनल पुढारी’ म्हणणाऱ्यांना जनतेनेच मतदानाने नाकारून परस्पर उत्तर दिले असल्याने मी जनतेच्या मताशी सहमत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदार संघातून स्वाभिमानी विकास आघाडीला २३ हजार ४७९ आणि शिराळ्यामधून १९ हजार ४३४ इतके मताधिक्य मिळाले. हे केवळ सामान्य जनताच करू शकते. जनतेने धनशक्तीच्या विरोधात हा कौल दिला असून या पासून शहाणपणा घेण्याचा साखर सम्राटांनी प्रयत्न करावा. अन्यथा जनताच त्यांची जागा दाखवेल, असे खा. शेट्टी यांनी सांगितले.
निवडणूक लढविण्यासाठी जनतेनेच मला वर्गणी काढून पसे दिले. केवळ १५ लाख रूपये घेऊन मी मदानात उतरलो. आíथक स्थिती ओळखून मतदारांनी मताबरोबरच आíथक दानही माझ्या पारडय़ात टाकले. त्यामुळेच मोठय़ा मताधिक्याने मी विजयी होऊ शकलो. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊन सुद्धा जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. लोकशाहीत सामान्य मतदाराच सुप्रीम असून या भूमिकेनेच मी जनतेसमोर गेलो. माझ्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. पुतळे जाळले, पण विचार जाळता येत नाही हे दिसून आले.
निवडणूक काळात सत्ताधारी गटाची सर्व मंडळी एकत्र येऊन माझ्यासह माझे विचार गाडण्याची भाषा करीत होते. वाटमारी, खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल करून मदानातून दूर सारण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय पातळीवर दंड करून बाद करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेच्या पाठिंब्यावर आपण टिकून राहिलो. खा. शेट्टी पुढे म्हणाले की, सदाभाऊ खोत यांनी माढा येथे जोरदार लढा दिला, साधनांची मोठय़ा प्रमाणावर उपलब्धता असतानाही राष्ट्रवादीला विजयासाठी तिथे झुंजावे लागले. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यश अधोरेखित होते. सदाभाऊ खोत यांना निश्चित पणे लोकप्रतिनिधी करू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 3:07 am

Web Title: the power consumption of a few days of state 3
Next Stories
1 गॅसच्या स्फोटात इचलकरंजीत सहा जखमी
2 रुग्णवाहिका मालमोटारीवर आदळून तिघांचा मृत्यू; ७ जखमी
3 पालकमंत्री चव्हाणांचा राष्ट्रवादीला टोला
Just Now!
X